
महाविकास आघाडी सरकारसाठी सुरवातीपासून मीच पुढाकार घेतला, पक्षनेत्या सोनिया गांधी यांच्यासह नेत्यांना पत्र लिहून सर्व शंका दूर केल्या व सरकारचा मार्ग मोकळा झाला, असा दावा खासदार हुसेन दलवाई यांनी बुधवारी (ता.22) केला.
औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारसाठी सुरवातीपासून मीच पुढाकार घेतला, पक्षनेत्या सोनिया गांधी यांच्यासह नेत्यांना पत्र लिहून सर्व शंका दूर केल्या व सरकारचा मार्ग मोकळा झाला, असा दावा खासदार हुसेन दलवाई यांनी बुधवारी (ता.22) केला.
पत्रकार परिषदेत श्री. दलवाई पुढे म्हणाले, की शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्वामध्ये फरक आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आरएसएसवर अनेकदा टीका केली आहे. अनेकदा कॉंग्रेसला मदत केलेली आहे. आणीबाणीचे समर्थन बाळासाहेबांनी केले होते. अंतुलेंच्या नेतृत्वातील सरकारला पाठिंबा दिला होता. प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपती निवडणुकीतही पाठिंबा दिला होता. हे सर्व मी सोनिया गांधी यांच्यासह दिल्लीतील नेत्यांना पत्र लिहून समजावून सांगितले.
...तर संजय राऊतांचं तोंड वंगणानं काळं करू
या पत्राचा फार मोठा परिणाम झाला. शिवसेनेसोबत गेल्यास कॉंग्रेसवर काय परिणाम होतील, याबाबत सोनिया गांधी यांच्या शंका दूर झाल्या. मीच पुढाकार घेऊन, मुस्लिम समाजाचे म्हणणे ऐकले. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच शिवसेनेसोबत आघाडी करण्याबाबतचे भाष्य मी केले होते, असा दावाही श्री. दलवाई यांनी केला.
चव्हाण का बोलले माहीत नाही
मुस्लिमांनी सांगितल्याने आम्ही शिवसेनेबरोबर गेलो, असे अशोक चव्हाण का म्हणाले माहीत नाही. पण त्यांचे म्हणणे बरोबर नाही, असे खासदार दलवाई यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे चालेल आणि ही आघाडी 25 वर्षे टिकेल, असा दावाही दलवाई यांनी केला.
आंतरराष्ट्रीय गाजलेले चित्रपट पाहायचेत? चला औरंगाबादला!
शिवसेनेने 2014 मध्येच आघाडीचा प्रस्ताव दिला होता, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. त्यावर विचारणा केली असता, शिवसेनेकडून ऑफर आली होती की नाही, हे मला माहीत नाही, परंतु, अशी ऑफर स्वीकारल्या गेली नाही, याचे मला वाईट वाटते. या ऑफरचा गांभीर्याने विचार करायला हवा होता. तेव्हाच ऑफर स्वीकारली असती, तर संपूर्ण देशभरातील चित्र वेगळे असते.
ठाकरे सरकार देईल मुसलमानांना आरक्षण
मुस्लिम समाज शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण देईल. हे सरकार राज्य पुन्हा एक नंबरवर आणेल. मुस्लिम समाजातील साडेअकरा टक्के लोकसंख्येला बाजूला ठेवून हे लक्ष्य साध्य करता येणार नाही, याची कल्पना उद्धव ठाकरे यांना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.