तुम्हाला माहिती आहे का आडनाव कशी पडतात? महाराष्ट्रातील काही आडनावांवर असा पडला प्रभाव

मधुकर कांबळे
Monday, 23 November 2020

 • आडनावांवर दिसतो अनेक घटकांचा प्रभाव. 
 • काही आडनावांत होतोय काळानुरूप बदल 
 • हातपुसे, कोंबडे, कोल्हे, लांडगे आडनावे बनली व्यक्तींची ओळख. 

औरंगाबाद : महाराष्ट्रात कोणत्याही व्यक्तीची ओळख ही त्यांच्या आडनावावरून पटते. यातून त्या व्यक्तीची, कुटुंबाची अचूक ओळख पटते. सर्रासपणे सर्वभागात आढळणारी आडनावे तर आहेतच याशिवाय ऐकायला कशीतरी वाटणारीही आडनावे आहेत. कारण या आडनावांवर, प्राकृतिक, भौगोलिक, नैसर्गिक घटकांचा, मानवी स्वभावांचा, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक घटकांचा प्रभाव पाहायला मिळतो आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
आडनाव म्हणजे उपनाम किंवा कुटुंबाची ओळख आहे. आडनावे कशी पडली असावीत याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. मदन सूर्यवंशी म्हणाले, एकच नाव धारण करणाऱ्या अनेक व्यक्तींची अचूक ओळख पटवण्यासाठी आडनावे तयार झाली असावीत. आडनावांवर भौगोलिक घटक, सांस्कृतिक घटकांचा, त्यांच्या स्वभावांचा, व्यवसायांचा प्रभाव आहे. त्यावरून त्यांची आडनावे तयार झाली आहेत. हीच पुढे त्या कुटुंबांची ओळख निर्माण झाली. काही आडनावे अलीकडच्या काळात काही लोकांना आवडत नसल्याने त्यात बदल करून घेतला जात आहे. भौगोलिक घटक, पर्यावरण, नैसर्गिक साधन संपत्ती, जैवविविधतेचा त्या आडनावावर प्रभाव जाणवतो. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील काही आडनावांचे उदाहरणे 

भूगोल विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. केशव उके यांनी या आडनावांविषयी अभ्यास केला आहे. त्यात त्यांनी दिलेल्या काही आडनावांची उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत.

 • अवकाशिय घटकांशी संबंधित आडनावे - बुधवंत, सूर्यवंशी , चंद्रात्रे, चांदणे, बुधवारे, सप्तर्षी. 
 • भौगोलिक घटकांशी संबंधित ः पठाडे, पर्वते, डोंगरे, घाटे, शिखरे, डोंगरदिवे, खडके, घळे, टेकाडे, सपाटे. 
 • हवामानाशी संबंधित ः उन्हाळे, हिवाळे, पाऊसकर, ढगे, वारे, दुपारे, कोरडे, अंधारे. 
 • वनसंपदा संबंधित ः आवळे, उंबरे, झाडे, जंगले, डहाळे, नारळे, बेले, वेलदोडे, जांभूळकर, नारळीकर, चंदनकर, टेंभुर्णे. 
 • मृदा संबंधित ः चिकटे, चिकणे, ओलावे, दलदले, आमले, काळे, भागरे, चिखले, बरडे, गाळे. 
 • पक्षी, प्राणी संबंधित ः कावळे, कोंबडे, चिमणे, भारद्वाज, तितरमारे, पाखरे, गजहंस, राजहंस, गरुड, घुबडे, ससाणे, बोकडे, गाढवे, सांबरे, घोरपडे, गायधने, हरणे, वाघ, कोल्हे, मगर, लांडगे, नागपाल, भुजंगे, रेडे, घोडेस्वार, चित्ते, डुकरे, उंदीरवाडे, वानरे. 
 • मानवी स्‍वभाव, सवयी संबंधित ः रगडे, हातपुसे, बावळे, बोंबले, मुके, गुणे, भिसे, शहाणे, हळवे, उदासी, गोडबोले, व्यवहारे, झोडपे, चोरपगार, खराबे, मुत्सद्दी, पोटभरे, निकाळजे, गंभीरे, भिडे, सुतवणे, मानकापे, नवघरे, सातघरे. 
 • कौटुंबिक घटक ः सातपुते, नवरे, नातू, बाळ, पोरे, घरघुसे, नारनवरे, दशपुत्रे, अष्टपुत्रे. 
 • रंगछटा संबंधित ः पांढरे, ढवळे, गोरे, काळे, गव्हाळे, तपकीरे, पिवळे, हिरवे, तांबडे, निळे, लालसरे, पांढरीपांडे, गंधे. 
 • शेती, फळांशी संबंधित ः कापसे, जोंधळे, धांडे, हळदे, गव्हाणे, तांदळे, भातखंडे, कांदेकर, कार्ले, भेंडे, फणसे, पडवळ, काकडे, लसणे, कणसे, कोंथंबिरे, मुळे, गाजरे, वांगीकर, श्रीफळे, कोहळे, भोपळे, करवंदे, गोडांबे, लिंबोरे, शेवगण, दोडके. 
 • शारीरिक घटकांशी संबंधित : डोळे, गालफोडे, डोईफोडे, शेंडे, एकबोटे, बारबोटे, दुतोंडे, पोटदुखे, पोटे, भुजबळ, बारहाते, डोके, दंताळे, कपाळे, नाकाडे, मानमोडे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Importance of last name and surname special story