सरकारमधील मुस्लिम मंत्री, नेत्यांनी हुजरेगिरी बंद करावी : खा. इम्तियाज जलील

शेखलाल शेख 
Friday, 31 July 2020

सरकारमधील मुस्लिम मंत्री, नेत्यांवर सोशल मिडियाच्या माध्यमांतून चांगलाच निशाना साधला. मुस्लिम मंत्री, नेत्यांनी हुजरेगिरी बंद करावी असा टोला त्यांनी लगावला. 

औरंगाबाद :  बकरी ईद अवघ्या काही तासांवर आली आहे, पण अजूनही कुर्बानीसाठी गुजरातमधून जनावरे घेऊन येणारे शेकडो ट्रक मुंबई पोलीसांनी सीमेवर अडवून ठेवले आहेत. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारमधील मुस्लिम मंत्री, नेत्यांवर सोशल मिडियाच्या माध्यमांतून चांगलाच निशाना साधला. मुस्लिम मंत्री, नेत्यांनी हुजरेगिरी बंद करावी असा टोला त्यांनी लगावला. 

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

इम्तियाज जलील म्हणाले की, मुंबईच्या सीमेवर पाच दिवसांपासून ट्रक उभ्या असल्याने अनेक बोकड मरण पावली आहेत. राज्य सरकारने जेव्हा ऑनलाईन जनावरे मागवण्याचा निर्णय घेतला तेव्हा सरकारमध्ये बसलेले मुस्लिम मंत्री, नेते आमदार मुग गिळून बसले होते का? समाजाच्या मोठ्या सणासाठी काही न करता तुम्ही आल्या नेत्यांच्या पुढे फक्त माना डोलवता, पण तुम्हाला पुन्हा लोकांमध्ये जायचे आहे हे लक्षात ठेवा आणि हुजरेगिरी बंद करा. राष्ट्रवादीच्या एका मंत्री असलेल्या नेत्याने काही दिवसांपुर्वी बकरी ईद नेहमीप्रमाणेच साजरी होईल असे सांगितले होते. प्रत्यक्षात ऑनलाईन जनावरांची ऑर्डर दिलेल्या लोकांनाही कुर्बानीसाठी जनावरे मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

बकरी ईद संदर्भात जेव्हा राज्य सरकारने निर्णय घेतले तेव्हा सर्वच पक्षातील मुस्लिम नेते, मंत्री काय करत होते? केवळ आपल्या नेत्यांना खूष करण्यासाठी हुजरेगिरी करण्याचे काम या लोकांनी केले. आता समाजाची माफी मागण्याचे नाटक ही मंडळी करत आहे. पण माफी मागून काही होणार नाही, ज्या समाजाने तुम्हाला निवडूण दिले, मंत्री केले,

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

त्यांचे प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसतील तर पदावर कशासाठी बसलात. सरकार जर तुमच ऐकत नसेल तर मंत्रीपदाचे आणि आमदारकीचे राजीनामे तोंडावर फेकून तुम्ही बाहेर पडायला पाहिजे होते. पण तुम्ही समाजापेक्षा पद आणि प्रतिष्ठेला अधिक महत्व दिले. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

सरकारमध्ये बसलेल्या आणि आम्ही मुस्लीमांचे कसे कैवारी आहोत हे दाखवणाऱ्या कॉंग्रेस- राष्ट्रवादीला हे दिसत नाही का? मुख्यमंत्र्यांना हे समजत नाही का?  बकरी ईदच्या संदर्भात सरकार जेव्हा नियमावली तयार करत होते, तेव्हा तोंडात लाडू गिळून बसलेल्या आणि आता आपापल्या एसी चेंबर्समध्ये शांत बसलेल्या सगळ्या मुस्लिम मंत्री, आमदार आणि नेत्यांना मी ईदच्या शुभेच्छा देतो असा टोमणा इम्तियाज जलील यांनी मारला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Imtiaz Jalil hit target Muslim ministers in government