esakal | कोविड रुग्णालयाची पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली पाहणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने आरोग्य सेवेसाठी रुग्णालयाची आवश्यकता लक्षात घेऊन; खबरदारीचा उपाय म्हणून  चिखलठाणा येथील मेलट्रॉन इमारतीत कोविड-19 रुग्णालयाची उभारणी श्री. देसाई यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे.

कोविड रुग्णालयाची पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली पाहणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : एमआयडीसीतर्फे नव्याने कोविड-१९च्या उपचारासाठी चिकलठाणा औद्योगिक परिसरातील मेलट्रॉन कंपनीच्या (सध्या सिपेटच्या)जागेवर अडीचशे खाटाचे  रुग्णालय तयार करण्यात येत आहे. शनिवारी (ता.३०)पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी या रुग्णालयात भेट देत कामाची पाहणी केली.

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने आरोग्य सेवेसाठी रुग्णालयाची आवश्यकता लक्षात घेऊन; खबरदारीचा उपाय म्हणून  चिखलठाणा येथील मेलट्रॉन इमारतीत कोविड-19 रुग्णालयाची उभारणी श्री. देसाई यांच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे. या कोविड रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या सर्व सोयी  सुविधांची माहितीही   श्री.देसाई यांनी घेतली. 

CoronaUpdate :आज 28 रुग्णांची वाढ,एकुण@ 1487

यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुभाष तुपे, कार्यकारी अभियंता भूषण हर्षे, उपअभियंता रवींद्र कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, डॉ.गुप्ता, अभय जरीपट्टे आदींची उपस्थिती होती.


VIDEO : हर्षवर्धन जाधव यांची दानवेंना आत्महत्येची धमकी, केले गंभीर आरोप

दहा हजार चौरस फूट हॉस्पिटल
हॉस्पिटलच्या जागेचे एकूण क्षेत्रफळ दहा हजार चौरस फूट आहे. त्यांपैकी पाच हजार ७०२ चौरस फूट क्षेत्रात हॉस्पिटलचे बांधकाम केलेले असेल. त्यात आठ हॉल असतील. त्याशिवाय हॉस्पिटलसाठी लागणाऱ्या इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.