CoronaVirus : अबब...सर्वात मोठे स्वयंपाकघर : कुठे ते वाचा

photo
photo

औरंगाबाद : मागील अनेक वर्षापासून ‘इस्कॉन अन्नामृत’ अन्नदानाचे काम अविरतपणे करीत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पहिल्यांदाच २१ दिवसांच्या लॉकडाऊनला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महामारीसह उपासमारीला सामोरे जावे लागू नये, याकरिता इस्कॉनने पुढाकार घेतला. पहिल्या दिवसापासून या स्वयंपाकघरातून २० हजार लोकांची भूक पूर्ण केली जात आहे. 

याबाबत इस्कॉनतर्फे सांगितले, की इस्कॉनच्या सदस्यांना मोठ्या प्रमाणात स्वच्छतेसह अन्न तयार करून वितरीत करण्याचा अनुभव होता. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही २० हजार लोकांना अन्नवाटप करण्याचे आवाहन पेलण्याची हिंमत केली. त्यानंतर या कार्यासाठी आर्थिक मदतीसह श्रमदानासाठी औद्योगिक कंपन्या, शासकीय कार्यालये, संस्था आणि व्यक्तीही पुढे आल्या. त्यामुळे हे आवाहन पेलण्यास शक्ती मिळाली. केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय लागू केल्यापासून आजवर दररोज २० हजार लोकांची भूक भागविली जात आहे. हे कार्य आवश्यकता असेपर्यंत सुरु ठेवण्याचा आमचा मानस आहे. याकरिता बजाज ऑटो,  जीएसटी कार्यालय, असंख्य व्यक्ती आणि संस्थेचे वेगवेगळ्या स्वरूपात सहकार्य मिळत आहे. बारा हजार चौरस फूट जागेवर आठ हजार चौरस फूटाचे औरंगाबाद जिल्ह्यातील हे सर्वात मोठे स्वयंपाक घर आहे, अशी माहिती इस्कॉनतर्फे देण्यात आली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

इस्कॉनचे स्वयंपाकघर

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये १२ हजार चौरस फूट जागेवर ८ हजार चौरस फूटावर इस्कॉन अन्नामृतचे स्वयंपाकघर तयार करण्यात आले आहे. यामध्ये वेगवेगळे विभागात ७७ कर्मचारी व १५ स्वयंसेवक काम करतात. यापैकी वॉशिंग विभागात २० महिला तर व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सुपरवायझर, कुक, ऑफिस हेल्पर, ड्रायव्हर, हेल्पर आणि बॉयलर ऑपरेटर असे एकूण ५७ पुरुषांसह ७७ कर्मचारी सेवा देतात.

इस्कॉनचे कामकाज

इस्कॉनमध्ये सेवा देणारे कर्मचारी पहाटे पाच वाजता स्वयंपाकघरात पोहोचतात. सहा वाजेपर्यंत याचठिकाणी आंघोळ करून स्वयंपाकघरातील कपडे परिधान करून कामासाठी सज्ज होतात. सहानंतर भाज्या व धान्य धुणे, भाज्या चिरणे आणि दाळ-तांदूळ शिजविण्याचे काम होते. या प्रक्रियेनंतर दाळ-तांदळात भाज्या मिक्स केल्या जातात. अखेरीस तयार झालेली खिचडी डब्यात पॅक करून सिल केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर कॅप, हँड ग्लोव्हज, प्रोटेक्टिंग शूज, फेस मास्क व ड्रेस असतो. दर तासाला हँड वॉशने हात धुतले जातात, तर प्रत्येक अर्ध्या तासाने सॅनिटायझर वापरले जाते. सध्या वितरकांसाठीही विशेष मार्गदर्शन इस्कॉनतर्फे केले जात आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मेडीकल चेकअप आणि स्क्रिनिंग

लॉकडाऊनदरम्यान संपूर्ण कर्मचाऱ्यांचे स्क्रिनिंग, तपासणी करण्यात आली. ज्यामुळे त्यांना कोणता आजार तर नाही नाही, याची चाचपणी करण्यात आली. त्यानंतरच त्यांना काम करण्यास मुभा देण्यात आली.

जीएसटी अधिकारी व लायन्स सदस्यांचे श्रमदान

या दरम्यान आपली सामाजिक बांधिलकी जपत बजाज ऑटो, जीएसटी कार्यालय, लायन्स क्लब, संस्था आणि व्यक्तींनी आर्थिक व श्रमदानाच्या रुपाने सहभाग नोंदविला. त्यात जीएसटी कार्यालयही मागे नाही. जीएसटीचे उपायुक्त आनंद पाटील, रविंद्र जोगदंड, सहायक आयुक्त सुजित कक्कड, धनंजय देशमुख, तुषार गावडे यांनी श्रमदानासह या उपक्रमास आर्थिक मदतही केली.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

त्याशिवाय पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी इस्कॉन अन्नामृतच्या स्वयंपाकघराला भेट देऊन सर्वांचे कौतूक करुन प्रोत्साहनही दिले. तसेच अनेक संस्था, उद्योग संस्था आदि आर्थिक मदतही करीत आहेत. यासाठी डॉ. सुशील भारुका, राजेश भारुका, डॉ. संतोष मद्रेवार, राजन नाडकर्णी,विशाल लदनिया, आनंद भारुका, रविंद्र करवंदे, राघवेंद्र बगडिया, दिलीप अग्रवाल, विजय अग्रवाल, प्रफुलकुमार अग्रवाल,  डॉ. हिमांशू गुप्ता, सुदर्शन पोटभरे, बी.एस. राजपाल, सुशील धूत, शेख हबीब आदींसह असंख्य संस्था, व्यक्ति परिश्रम घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com