
मुंबई, पुणे येथे मर्यादित न राहता आयटी कंपन्या मराठवाड्याच्या राजधानीत म्हणजे औरंगाबाद यायला हव्यात. यासाठी आपण टाटा समूह व अन्य कंपन्यांत समोर प्रस्ताव मांडला होता.
औरंगाबाद : औरंगाबादेत आयटी कंपन्या आणण्यासाठी आपण पालकमंत्री व उद्योगमंत्री या दुहेरी नात्याने प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी रविवारी (ता.19) टाटा समूहाचे तन्मय चक्रवर्ती यांच्यासोबत ऑरिक सिटीमध्ये पाहणी केली असून आयटी उद्योग येथे आणण्या बाबत अनुकूलता दर्शविली असल्याचा दावा पालक मंत्री सुभाष देसाई यांनी केला.
जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी पार पडली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना देसाई म्हणाले. मुंबई, पुणे येथे मर्यादित न राहता आयटी कंपन्या मराठवाड्याच्या राजधानीत म्हणजे औरंगाबाद यायला हव्यात. यासाठी आपण टाटा समूह व अन्य कंपन्यांत समोर प्रस्ताव मांडला होता.
हेही वाचा : प्रकरण गेले थेट मातोश्रीपर्यंत...शिवसेनेच्या आमदार, उपमहापौराससह सहाजणांवर...
त्या अनुषंगाने ऑरिक सिटी मध्ये उपलब्ध सुविधांची पाहणी केली. त्यानंतर टाटा समूहाने व अन्य प्रकाश जैन यांच्यासोबत पाहणी केली. आयटी कंपन्या आपल्या परिसरात आणण्यासाठी शासकीय धोरणांमध्ये काही बदल करावे लागतील त्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत.
पर्यटन विकासासाठी उद्या आढावा
औरंगाबाद पर्यटन जिल्हा असून पर्यटनाला याठिकाणी मोठा वाव आहे. अजिंठ्याच्या रस्त्यासह विमानतळाची धावपट्टी वाढविणे, वेरूळ येथील लाईट आणि साऊंड मंजूर प्रकल्पत अधिक भर कशी घालता येईल, यासह पर्यटनाच्या अनुषंगाने काय करावे, याचा अहवाल मागवला होता. त्याबाबत उद्या मंगळवारी (ता.21) पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत मुंबई येथे चर्चा करणार आहेत. औरंगाबादच्या विकासासाठी त्यांनी दौरा करावा, अशी विनंती त्यांना केली जाईल, असे श्री. देसाई यांनी सांगितले.
क्लिक करा : चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं
घाटी रुग्णालय सुसज्ज व्हावे
घाटी रुग्णालय येथे हे उपचारासाठी मराठवाड्यासह खानदेशातून मोठ्या संख्येने रुग्ण येतात मात्र यांना आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत अशी माहिती वारंवार समोर आलेली आहे. त्यासाठी येथे येणाऱ्या रुग्णांचे पूर्ण समाधान व्हावे त्यांना चांगला औषधोपचार मिळावा, यासाठी यंत्रसामुग्री व अन्य काय काय अडचणी आहेत याची माहिती घेत आहोत येत्या 26 रोजी आपण स्वतः घाटी मध्ये जाऊन पाहणी करणार आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे रुग्णालय सुसज्ज होईल यासाठी प्रयत्न केले जातील.