‘डंपिंग ग्राउंड’वर फुलतंय जैवविविधता उद्यान 

photo
photo

औरंगाबाद ः पर्यावरणाचा वसा घेतलेल्या जनसहयोग सेवाभावी सामाजिक संस्थेने ‘अमेझॉन २०२०’ या उपक्रमाला सुरवात केली. संस्थेने छावणी डंपिंग ग्राउंड आणि वाळूज रोड परिसराला वनराई करण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत विविध ठिकाणी तब्बल ३० हजार झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे, संस्थेचे पदाधिकारी स्वतः श्रमदानातून अविरत काम करीत आहेत. मराठवाड्यातील एक उत्तम जैवविविधता उद्यान साकारण्याचा संस्थेचा हा प्रयत्न प्रेरणादायी आहे. 

अविरत कार्य सुरू 

जनसहयोग संस्थेने दोन वर्षांत ७५ प्रजातींची ११ हजार झाडे लावली आहेत. येणाऱ्या आठवड्यात जवळपास १५०० रोपे लावण्याचा संस्थेचा मानस आहे. रविवारी (ता. दोन) नवीन ३० प्रजातींची १२०० झाडे लावण्यात आली. वाळूज, छावणी डंपिंग ग्राउंड आणि परिसरात आतापर्यंत ८५ प्रकारची विविध देशी प्रजातीची झाडे लावण्यात आली आहेत. संस्थेने आतापर्यंत २२ ठिकाणी ३० हजारांहून अधिक झाडे लावली आहेत. 

अशा आहेत प्रजाती 

संस्थेने लावलेल्या झाडांमध्ये काटेसावरी, पिंपळ, वड, बोर, उंबर, मोह, आपटा, कांचन, जंगली बदाम, खैर, बेल, शमी, कडुनिंब, अजान, आईन, सप्तपर्णी, शिवण, बेहडा, हिरडा, बहावा, कवठ, पळस, आवळा, पुत्रांजिवा, तामण, देशी बाभूळ, कदंब, मोठा करमळ, धामण, करंज, बिबा, अर्जुन, रानपांगरा, बुचपांगरा, शिरीष, रक्तचंदन, भुत्या, कंडोळ, करू, भोकर, करवंद, शेवगा, हादगा, बकुळ, कुंभा, खिरणी, टेटू, किनई, बकान नीम, पारस पिंपळ, आपटा, कांचन, रिठा, शिंदी, शिसवी, वारस, महारुख, गुलमेदी, लकूच, बिजा, लोखंडी, फणस, चिंच, चिंचाड, तुती, वावळ, ढेड, काळा, गाडा उंबर, लक्ष्मीतरू यासह स्थानिक झाडांचा सामावेश आहे. 

अशी आहे टीम 

अध्यक्ष प्रशांत गिरे, संदीप जगधने, श्‍यामअण्णा जेपल्लीकर, कैलास खांड्रे, नंदन जाधव, किशोर कासार, अमोल मोरे, उन्मेष ढोके, प्रदीप यादव, संतोष दंडिमे, अंकुश वैरागड, नंदकिशोर सोनार, शिवाजी भिंताडे, डॉ. संतोष वैरागड, अमजद अली, मिलिंद गिरिधारी, मनोज करलगीकर, कासीम शेख, रशीदभाई, विलास जाधव, अजय दाभे, राकेश शहाणे, विशाल बिरारे, बाबूराव थोरात. 

 
मराठवाड्याचे अक्षरशः वाळवंट होत आहे. जमिनीतील पाण्याचा स्तर दिवसेंदिवस चिंता निर्माण करणारा आहे. त्यामुळे भूभागावर ३३ टक्के वनराई आवश्यक आहे. हे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत म्हणजे सृष्टीवरील चित्र बदलण्यासाठी काम केले पाहिजे, या भावनेने श्रमदानातून आम्ही काम करीत आहोत. 
- प्रशांत गिरे, अध्यक्ष, जनसहयोग संस्था 

-

पर्यावरणासाठी अनेकजण काम करीत आहेत. त्यात निष्ठेने सुरू असलेले जनसहयोगचे काम प्रचंड मोठे आहे. झाडांची गरज लक्षात घेऊन ठराविक प्रजातींची झाडे लावण्यासाठी प्रत्येक रविवारी श्रमदान केले जात आहे. या कामासाठी छावणी परिषदेतर्फे संपूर्ण सहाकार्य करण्यात येत आहे. 
- विक्रांत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, छावणी परिषद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com