esakal | पहा Video : जायकवाडीचे दोन गेट उघडले; गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

jayakwadi.jpg

पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यात होत असलेल्या वाढीमुळे धरण प्रशासनाने शनिवारी (ता. ५) धरणाच्या मुख्य दोन दरवाजातून गोदापात्रात पाणी सोडले आहे. सदरील दोन दरवाजे अर्धाफूट उंचीने उघडण्यात आले आहे.

पहा Video : जायकवाडीचे दोन गेट उघडले; गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरु

sakal_logo
By
चंद्रकांत तारु

पैठण (औरंगाबाद) : येथील जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यात होत असलेल्या वाढीमुळे धरण प्रशासनाने शनिवारी (ता. ५) धरणाच्या मुख्य दोन दरवाजातून गोदापात्रात पाणी सोडले आहे. सदरील दोन दरवाजे अर्धाफूट उंचीने उघडण्यात आले आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

एकुण २७ वक्र दरवाजातील क्रमांक दहा व सत्तावीस क्रमाकामधून १,०४८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सुरु करण्यात आला आहे. यापुर्वी जलविद्युत केंद्रातून १,५८९ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता गोदापात्रात एकुण दोन हजार ६३७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग होऊ लागला आहे. 

प्रारंभी धरणाच्या मुख्य भिंतीवर दरवाजाच्या यंत्राचे पुजन करण्यात आले. त्यानंतर मशीनचे बटन दाबून पाणी सोडण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता दिलीप तवार, जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, धरण सहायक अभियंता संदीप राठोड, बुध्दभुषण दाभाडे, तांत्रिक सहायक राजाराम गायकवाड यांची उपस्थिती होती. धरण मुख्य दरवाजा, उजवा कालवा व जल विद्युत निर्मिती केंद्र या तीन ठिकाणाहून पाणी सोडण्यात आल्यामुळे धरणाच्या वाढत्या पाणी पातळीवर धरण प्रशासनाला नियंत्रण ठेवता येईल, असेही प्रमुख अभियंत्यांनी सांगीतले. 

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन  

अखेर शनिवारी सोडले पाणी 
आज पाणी सुटणार उद्या पाणी सुटणार अशी चर्चा रंगत असताना पैठणच्या नाथसागर जलाशयातून गुरुवारी (ता.3) धरणाच्या पाण्याची 96.06 टक्केवारी झाल्यामुळे उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी दोनशे क्युसेक पर सेंकद पाणी सायंकाळी पाच वाजता सुरू करण्यात आले होते. नाथसागरात पाणी वाढल्यास आवश्यकतेनुसार डाव्या कालव्यातून व गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती धरण नियंत्रण कक्षातून देण्यात आली होती. अखेर शनिवारी हा निर्णय धरण प्रशासनाने घेतला आहे. १० व २७ नंबर गेटमधून पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला आहे.  
 

go to top