भाजपात गेले, नाराज झाले, पुन्हा आले माघारी

माधव इतबारे
Wednesday, 19 February 2020

मूळचे शिवसैनिक असलेले तनवाणी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये गेले होते, तर बारवाल २०१५ मध्ये महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्याने नाराज होत अपक्ष लढले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत महापालिकेत अपक्ष नगरसेवकांची आघाडी केली होती.

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी इतर पक्षातील पदाधिकारी, नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम सुरू आहे. आता तर शिवसेनेने भाजपला भलेमोठे खिंडार पाडले आहे. 

भाजपचे माजी शहराध्यराध्यक्ष किशनचंद तनवाणी, शहरउपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड व माजी महापौर तथा शहर विकास आघाडीचे गटनेते गजानन बारवाल स्वगृही परतले आहेत. शहराध्यक्षपदी पुन्हा संधी न दिल्यामुळे नाराज असलेल्या तनवाणी यांच्यासह दोघांना बुधवारी (ता. १९) मुंबईत मातोश्री येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. 

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचे जोरदार तयारी सुरू केली असून, त्यासाठी इतर पक्षातील पदाधिकारी, नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम सुरू आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकारानंतर दोन दिवसांपूर्वी तनवाणी समर्थक गजानन बारवाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यामुळे भाजपला खिंडार पडणार असल्याची चर्चा शहरात होती.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

दरम्यान बुधवारी सकाळी शिवजयंतीचा मुहूर्त साधत माजी आमदार तथा भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, भाजपचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, शहर विकास आघाडीचे गटनेते व माजी महापौर गजानन बारवाल यांनी बुधवारी मुंबईत मातोश्री वर धाव घेतली. सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तनवाणीच्या प्रवेशामुळे भाजपला औरंगाबादेत मोठे खिंडार पडले आहे.

शिवाजी महाराजांवरील उर्दू पुस्तके वाचा

मूळचे शिवसैनिक असलेले तनवाणी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये गेले होते, तर बारवाल २०१५ मध्ये महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्याने नाराज होत अपक्ष लढले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत महापालिकेत अपक्ष नगरसेवकांची आघाडी केली होती. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तिघांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपला हा मोठा झटका बसला असल्याचे बोलले जात आहे.

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह  

शहराध्यक्षांच्या निवडीपासून किशनचंद तनवाणी नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी काल मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. तनवाणी यांचे समर्थक १० ते १२ नगरसेवक असून, ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. तनवाणी यांच्यासोबत आमदार संजय शिरसाट व अंबादास दानवे यांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kishanchand Tanwani Returned In Shivsena Aurangabad Breaking News