औरंगाबाद : कायमस्वरूपी असावे कोविड रुग्णालय, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे

प्रकाश बनकर
Friday, 12 June 2020

  • ऑनलाईन पद्धतीने कोविड रुग्णालय व संसर्ग संशोधन प्रयोगशाळेचे लोकार्पण.  
  • मुंबईतील कस्तुरबा, पुण्यातील नायडू संसर्गजन्य रुग्णालयाच्या धर्तीवर औरंगाबादेतील रूग्णालयही कायमस्वरूपी करावे.
  • उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे.  

औरंगाबाद : पंधरा ते वीस दिवसात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी २५६ खाटांचे हे रुग्णालय तयार केले आहे. तसेच विद्यापीठातील कोविड विषाणू संशोधन प्रयोगशाळाही तयार केली आहे. मुंबईतील कस्तुरबा, पुण्यातील नायडू संसर्गजन्य रुग्णालयाप्रमाणे हे रूग्णालयही कायमस्वरूपी करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री व उद्योगमंत्री सुभाष देसाई शुक्रवारी (ता.१२) मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली.

 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.
एमआयडीसीतर्फे चिकलठाणा येथील मेल्ट्रोन कंपनीच्या जागेवर कोविड रुग्णालय तयार करण्यात आले आहे. यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये विषाणू संशोधन प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने रूग्णालय व प्रयोगशाळेचे लोकार्पण करण्यात आले. 

 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  

यावेळी उद्योगमंत्री देसाई यांनी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांच्याशी संवाद साधला  ते म्हणाले की, संसर्गजन्य आजारांसाठी कायमस्वरूपी रुग्णालय असणे गरजेचे आहे. औरंगाबाद एमआयडीसीतर्फे युद्धपातळीवर एका महिन्याच्या आत हे रुग्णालय तयार करण्यात आले आहे. हे रुग्णालय कोरोना असेपर्यंत राहील. मात्र हे रुग्णालय कायमस्वरूपी सेवा देणारे असावे, यासाठी वैद्यकीय विभागाने यात लक्ष घालावे.

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

तसेच विद्यापीठात विषाणू तपासणी प्रयोगशाळा व संशोधन केंद्र कायमस्वरूपी सुरु करण्यात येत आहे. यानिमित्ताने मराठवाडा विभागासाठी आवश्यकता असलेली प्रयोगशाळा ‘ऑरिक सिटी’च्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यास हातभार लागलेला आहे. राज्यशासनाने चांगल्या व सुसज्ज अशा आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याचा लाभ घेऊन नागरिकांनी वेळेत उपचार घेऊन ठणठणीत बरे व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   

उद्घाटनावेळी कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, उदयसिंग राजपूत, अंबादास दानवे, सतीश चव्हाण, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांची उपस्थिती होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kovid Hospital should be permanent Subhash Desai requested to the Chief Minister