
‘एवढ्या प्रकारच्या लस्सी बनवता येऊ शकतात का’, असे आश्चर्य इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् च्या परीक्षक रेखा सिंघ यांनी व्यक्त केले.
औरंगाबाद : एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या सहकाऱ्यांनी रविवारी (ता. २४) ४४ मिनिट ३७ सेकंदांत तब्बल ७२ प्रकारच्या लस्सी बनवल्या. त्याची आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झाली आहे. विक्रमाची घोषणा झाल्यानंतर टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त झाला. ‘एवढ्या प्रकारच्या लस्सी बनवता येऊ शकतात का’, असे आश्चर्य इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् च्या परीक्षक रेखा सिंघ यांनी व्यक्त केले.
धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया,‘मी राजकीय भांडवल केले नसते’
या प्रकारच्या लस्सी
इंडिया बुक रेकॉर्डस् मध्ये एमजीएमने मानाचे पान मिळवले आहे. शेफ रूपेश भावसार, गोरख औताडे, अमित पवार यांच्यासह विद्यार्थ्यांच्या टीमने या लस्सी बनवल्या. पेरू, चिकू, आंबा, अननस द्राक्षे, अंजीर, काजू, बदाम, पिस्ता, केळी, नारळ, पिअर, संत्री, गुलाब, कलिंगड, किवी, केशर, स्ट्रॉबेरी, गाजर, सफरचंद, चेरी, बीट, गुलकंद, पान, कलाकंद, मलई, कंदी पेढा, काजू कतली, पपई, हळद, जामून, चॉकलेट, व्हॅनिला, ब्लुबेरी, ओरिओ, रसमलई, मिंट, जिरे यासारख्या फ्लेवरच्या लस्सी बनवण्यात आल्या. पहिल्या अर्ध्या तासातच ५० प्रकारच्या लस्सी बनवल्या होत्या. रेखा सिंघ, नागेंद्र सिंघ यांनी परीक्षण केले. डॉ. गिरीष गाडेकर, एमजीएम आयएचएमचे प्राचार्य अनिकेत जोशी, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
Edited - Ganesh Pitekar