शेतकऱ्यांनो, आज शेवटचा दिवस आहे बरं का... 

सुशेन जाधव
सोमवार, 30 डिसेंबर 2019

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे.

औरंगाबाद : शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असो, की सेंद्रिय उत्पादनांचे स्टॉल. सगळे काही एकाच छताखाली खरेदी करण्याची संधी 'सकाळ-ऍग्रोवन'च्या कृषी प्रदर्शनामुळे मिळाली आहे.

शेतीतील अवजारे, कृषीविषयक पुस्तके, गृहोपयोगी वस्तू, पदार्थांचे स्टॉल, हजार बाराशे रुपयांपासून पाच ते सात हजारांपर्यंतची घोंगडी, असे सगळे काही या ठिकाणी आहे. या प्रदर्शनाला रविवारी (ता.30) शहरवासीयांसह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी रविवारी (ता.30) मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे या कृषी प्रदर्शनाला कृषी जत्रेचे स्वरूप आले होते. 

Image may contain: 3 people, people standing

मराठवाडा, विदर्भच नव्हे तर अगदी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, धुळे आणि कोकणातूनही शेतकरी या ज्ञानमेळाव्यात सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पारस ग्रुप असून, महाफिड फर्टिलायझर्स, एमव्हीएस ऍक्‍मे, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), गरवारे टेक्‍निकल फायबर्स आणि महाऊर्जा सहप्रायोजक आहेत. 

Image may contain: 12 people

एकमेकींशी चर्चा करत ज्ञानाचे आदानप्रदान 

मनात घोळत असलेला कोणताही मुद्दा विचारावा आणि भरपूर खरेदी करावी, असे चित्र महिला शेतकऱ्यांचे होते. कंपन्या किंवा शास्त्रज्ञांकडून माहिती गोळा करून शेतीमधील अडचणी दूर करून शास्त्रोक्त नियोजनातून व्यावसायिक शेती कशी करता येईल, यासाठी ग्रामीण भागातील युवक धडपड करीत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजूला थेट शेतकऱ्याच्या परडीतील अस्सल गावरान शेतमाल खरेदी करण्यासाठी शहरी ग्राहकांच्या रांगा लागल्या. त्यामुळे कृषी विभागाने आत्माअंतर्गत स्थापन केलेल्या बचतगटाच्या स्टॉल्सवर झुंबड उडाली. 

Image may contain: one or more people, people sitting and indoor

घेतले नाही म्हणून काय झाले, माहिती तर घेऊ? 

अवजारे व यंत्रे विभागात प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून तोबा गर्दी आहे. छोट्या ट्रॅक्‍टरपासून ते हातचलित कोळप्यापर्यंत सर्व अवजारांची माहिती शेतकरी बारकाईने घेत आहेत. लासूर भागातील (ता. गंगापूर) येथील शेतकरी प्रेमराज औताडे म्हणाले, की गावाकडून लासूरला बाजार करायला आलो होतो. 

हेही वाचा : video - मनुष्यालाच नव्हे तर चक्क कुत्रे, मांजरांनाही होतो मधुमेह  

तीन तासांसाठी औरंगाबादला आल्याचे सांगताना ते म्हणाले, की शेतीपयोगी बरीच अवजारे बघितली, पाहिजे तितकी खरेदीही केली. अजूनही काही अवजारे घ्यायची आहेत; पण आता पैसे नाहीत; मात्र एक दिवस नक्की घेणार, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. पाणीटंचाई हा शेतकऱ्यांसाठी कळीचा मुद्दा आहे.

Image may contain: 7 people, people standing and outdoor

 

त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी साचून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कसा वापर करता येईल, अशी तळमळ असलेले शेतकरी शेततळे प्लॅस्टिक कागद, ठिबक संच, सबमर्सिबल पंप, सोलारपंप याची माहिती व विक्री करणाऱ्या स्टॉल्सवर गर्दी करीत होते.

मराठवाडा-विदर्भातून येताहेत शेतकरी

नामवंत कंपन्यांचा सहभाग असलेल्या या प्रर्शनात शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, खते, बियाणे, कीटनाशके, कृषी अवजारे, यंत्रे, उद्योग प्रक्रिया, तुषार, ठिबक क्षेत्र तसेच ग्रीन हाऊस, तंत्रज्ञानातील कंपन्यांनी सहभाग नोंदविला.

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी भेट दिलेले शेतकरी पुन्हा प्रदर्शनास भेट देत आहेत. एवढे नव्हे तर मराठवाड्यासह पश्‍चिम विदर्भातील विविध जिल्ह्यांतून शेतकऱ्यांचे गटचे-गट प्रदर्शन भेटी देत आहेत.

आपला नवीन उद्योग, उभा करण्यासाठी कोणी यंत्राची माहिती जाणून घेतली तर कुणी आपल्या शेतातील फळबाग कसे घ्यावेत यांची माहिती घेत होते; तर कुणी आपल्या शेतात ठिबक आणि तुषार सिंचन करण्याची माहिती विचारत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Last Day Of Agrowon Agriculture Exhibition in Aurangabad