मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच!

विकास देशमुख
Friday, 3 January 2020

आम्ही तुम्हाला गूगलच्या काही खास सेटिंग्ज सांगणार आहोत. या सेटिंग्ज केल्यानंतर तुम्ही बिनधोक तुमचा मोबाईल कुणाच्याही हाती देऊ शकता. एवढेच नाही तर तुमच्या फोनवर कुणी काय सर्च करू नये, हेही ठरवू शकता. 

औरंगाबाद - स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनला आहे. आपण आपल्या मोबाइलमध्ये काय सर्च करतो, आपल्या फोनमध्ये कुठले अॅप्स्‌ आहेत. यावरून आता आपला स्वभाव ओळखला जाऊ लागला आहे. त्या आधारेच विविध कंपन्या आपल्याला जाहिराती दाखवत आहेत. त्यामुळे अनेक जण इतर कुणाच्या हातात मोबाईल देण्यास धजावत नाहीत. हेच हेरून आम्ही तुम्हाला गूगलच्या काही खास सेटिंग्ज सांगणार आहोत. या सेटिंग्ज केल्यानंतर तुम्ही बिनधोक तुमचा मोबाईल कुणाच्याही हाती देऊ शकता. एवढेच नाही तर तुमच्या फोनवर कुणी काय सर्च करू नये, हेही ठरवू शकता. 
 
अशी थांबवा अश्लील सामग्री 
कुणी जर नकळत तुमच्या फोनमध्ये अश्लील सामग्रीचा शोध घेत असेल तर सुरवातीला तुम्ही तुमच्या फोनमध्ये सेटिंग्जमध्ये जाऊन किंवा google.com लिहून सर्च करा. नंतर त्यात आलेल्या सर्च सेटिंग्स पर्यायावर क्‍लिक करा. सर्च सेटिंग्समध्ये क्‍लिक केल्यानंतर सर्वांत वर तुम्हाला filter explicit results दिसेल. त्याला ऑन करा. ऑन केल्यानंतर काळ्या ठिबक्‍याने टीक केलेले दिसेल.

त्यानंतर सर्वांत खाली save असे लिहिलेले दिसेल. या सेटिंग्जला सेव्ह करून घेतल्यानंतर तुमच्या फोनमध्ये कुणी अश्‍लील चित्रफिती किंवा छायाचित्र सर्च केले तरी गूगल त्याचा शोध घेणार नाही. जर ही सेटिंग्ज करूनही एडल्ट सामग्री दिसणे बंद झाले नाही तर do not use private results वर क्‍लिक करून सेव्ह करा. 

 
अशा थांबवा अनावश्‍यक जाहिराती 
आपण फोनमध्ये काय सर्च करतो त्या आधारे गूगल आपल्याला जाहिराती दाखवतो. पण, काही जाहिराती आपल्या नको असतात. त्यामुळे आपल्या सर्चच्या आधारे गूगलने आपल्याला जाहिराती दाखवू नये, यासाठी तुमच्या फोनमध्ये गूगल सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर साइट सेटिंग्समध्ये जा. नंतर अॅडवर क्‍लिक करून त्याला off करा. असे केल्यास तुम्ही काय सर्च केले त्या आधारे गूगल तुम्हाला जाहिराती दाखवणार नाही. शिवाय तुमच्या फोनवर जाहिरातीचे प्रमाणही खूप कमी होईल. 

 
असे सर्च केल्यास राहणार नाही हिस्ट्री 
क्रोममध्ये उजव्या बाजूने वर असलेल्या तीन डॉटवर क्‍लिक केल्यास New incognito tab हा पर्याय दिसेल. त्यावर क्‍लिक केल्यास क्रोमची काळी विंडो उघडले. या विंडोमध्ये सर्च केलेल्या कुठल्याची गोष्टीची नोंद तुमच्या सर्च हिस्ट्रीमध्ये राहत नाही. शिवाय त्या आधारे गूगल जाहिरातीही दाखवत नाही. 
 
सर्च हिस्ट्रीची नोंदही थांबवता येते 
जर तुम्हाला तुम्ही सर्च करीत असलेल्या हिस्ट्रीची नोंद नकोच असेल तर तुम्हाला Welcome to My Activity मध्ये जाऊन ती ऑफ करता येते. तसे केल्यास गूगल तुमचे रेकॉर्ड ठेवणे बंद करेल. 

अरे बाप रे -  औरंगाबादेत आठ जणांचे कुत्र्यांनी तोडले लचके 

गूड न्यूज -  घाटीतील तीन इमारतींच्या वीज जोडणीचा मार्ग मोकळा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letest News About Google Settings Marathi Info