esakal | Breaking : महत्त्वाचा निर्णय, आता या तारखेपर्यंत कडक लॉकडाउन
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown in Aurangabad till May 20

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद शहरामध्ये २० मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे.

Breaking : महत्त्वाचा निर्णय, आता या तारखेपर्यंत कडक लॉकडाउन

sakal_logo
By
राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद शहरामध्ये २० मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी यावेळी दिले. 

शहरात पोलिस प्रशासनाकडून कंन्टेनमेंट झोनमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कंन्टेनमेंट झोनमधून नागरिकांचे बाहेरील भागात तसेच बाहेरील भागातील नागरिकांचे कंन्टेनमेंट झोनमध्ये होणारी आवागमन बुधवार पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कंन्टेनमेंट झोनमध्ये जिवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सुचना संबंधित यंत्रणांना देत नागरिकांनीही सहकार्य करुन कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी यावेळी केले. 
  
मृत्यू कमी करण्यासाठी करा प्रयत्न 
शहरात कोविडमुळे आत्तापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक रुग्णांची केसस्टडी करुन मृत्युदर आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने प्रयत्न करावे, असे श्री. केंद्रेकर यांनी म्हटले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट दिली. यावेळी घाटीच्या अधिष्ठाता, डॉ. कानन येळीकर, डॉ. कैलास झिने, डॉ. कैलास चिंतले या चर्चेत उपस्थित होते. 

धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित

मागील काही दिवसांपासून कोविड-१९ बाधित व्यक्तीच्या मृत्यू बाबत सखोल आढावा घेतला. त्यांनी कोविडमुळे मृत्यू बाबत चिंता व्यक्त केली. असे लक्षात आले की, त्यातील तीन कोविड बाधित व्यक्तींचे मृत्यू हे या संस्थेत दाखल झाल्यापासून दोन तासाच्या आतच उपचारा दरम्यान झाले आहेत, यावरुन असे दिसते की त्यांना या संस्थेत दाखल करतेवेळी त्यांची स्थिती गंभीर होती. तसेच आणखी दोन कोविड बाधित मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी एका रुग्णांचे वय ७० व एका रुग्णाचे वय ७४ असे होते. तसेच या दोन रुग्णांना डायबिटीस, ब्लड प्रेशर, हायपरटेंशन, फुफुसांचा जुना आजार व एका रुग्णाला मधुमेहा सोबत मानसिक आजाराचा त्रासाने ग्रस्त होते. त्यामुळे असे कोविड बाधितांचे जे मृत्यू होतात त्यांचे सरासरी वय वर्ष ६०पेक्षा जास्त होते व इतर आजाराने ते ग्रस्त होते.

हा ब्लॅक अॅण्ड व्हॉइट फोटो आपोआप होतो कलर, जाणून घ्या कारण...

मागील चार दिवसापूर्वी कोविड करीता प्रसिध्द झालेल्या आंतरराष्ट्रीय लॅनसेटजर्नलमधील आर्टिकलनुसार त्यांनी सुचविलेली औषधे कशी व कोठून प्राप्त होतील याबाबत माहिती घेण्यात येण्याबाबत निर्देश दिले व लॅनसेटनुसार interferon beta-१b, lopinavir-ritonavir, ribavirin अशी चार औषधे देण्यास हरकत नाही असे सांगीतले. यासंबंधी आयसीएमआर रिसर्च प्रोजेक्ट तयार करण्या बद्दल सूचित केले याबाबत अधिष्ठाता डॉ कानन येळीकर म्हणाल्या की, जे पाच प्रोजेक्ट आयसीएमआर येथे सादर केलेले आहेत ते मान्य होतील व त्याअनुषंगाने नवीन औषधी प्राप्त होतील. यावेळी विभागीय आयुक्तांनी कोविड स्वॅब तपासणी बाबत जिल्हाधिकारी, आयुक्त महानगरपालिका ,जिल्हा शल्यचिकित्सक यांनी एकत्रित बैठक घेऊन त्यावर चर्चा करुन मार्गदर्शन सूचना देण्यात याव्यात असेही यावेळी सांगितले.