परळीत लॉकडाउन जाहीर

lockdown declared in parli
lockdown declared in parli

परळी वैजनाथ : शहरातील  स्टेट बँक ऑफ इंडिया मधील पाच अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे शनिवारी (ता. चार) आढळून आल्यानंतर शहरासह परीसरातील काही गावांत कंटेनमेंट झोन जाहीर करुन पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली. विषाणू सममुह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी २५ हजार घरांतील एक लाख ३३ हजार लोकांचे आरोग्य सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.

या बँकेमध्ये शहर आणि बँकेची दत्तक गावे व परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात संपर्क आलेला आहे. त्यामुळेे शहर आणि या गावांमध्ये कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून पूर्णवेळ संचारबंदी लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
   
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यापूर्वी येथील एका कोरोनाबाधीत वृद्धेचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. पुन्हा शनिवारी शहरात सर्वात जास्त ग्राहक असलेली व गर्दी असलेल्या राणी लक्ष्मीबाई टाँवर चौकातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने शहरात खळबळ माजली.

म्हणून प्रशासनाच्या वतीने जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहर आणि तालुक्यातील बेलंबा, बोधेगाव, दैठणा घाट, दाऊतपुर, इंजेगाव, जिरेवाडी , कावळ्याचीवाडी , कासारवाडी, कौडगाव घोडा, कौठळी, नंदनज, नाथरा, परळी( ग्रा), गाढे पिंपळगाव, सारडगाव आणि आचार्य टाकळी येथे कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान शहरात या अगोदरही दोन कोरोना पाँझिटीव्ह रुग्ण आढळले होते. तसेच येथील रहिवाशी पालकमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनाही बाधा झाल्याचे मुंबईत समोर आले होते. महिला रुग्णाचा औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर, इतर लोक उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले. दरम्यान, कोरोना विषाणूचा समुह संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने २५ हजार घरांतील एक लाख ३३ हजार लोकांचे आरोग्य सर्व्हेक्षण करण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com