मराठा क्रांती मोर्चातर्फे साष्टपिंपळगाव ते औरंगाबाद दरम्यान मशाल रॅली, पाच फेब्रुवारीपर्यंत ठिय्या आंदोलन

प्रकाश बनकर
Thursday, 28 January 2021

एक फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता साष्ठपिंपळगाव येथून ही वाहन मशाल रॅली निघणार असून दुपारी चार वाजता औरंगाबादेतील क्रांती चौकात या रॅलीचा समारोप होईल.

औरंगाबाद : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने साष्टपिंपळगाव, कोल्हापूर, आझाद मैदानावर २० जानेवारीपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे साष्टपिंपळगाव (ता.अंबड जि. जालना) ते औरंगाबाद दरम्यान एक फेब्रुवारीला मशाल रॅली काढण्यात येणार आहे. पाच फेब्रुवारीच्या निकालावर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती क्रांती मोर्चाचे समन्वयकांनी गुरुवारी (ता.२८) पत्रकार परिषदेत दिली.

नवऱ्यावर रागावून जीव द्यायला गेली, पण एकमेकांना पाहताच ढसढसा रडले!!! 

एक फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता साष्ठपिंपळगाव येथून ही वाहन मशाल रॅली निघणार असून दुपारी चार वाजता औरंगाबादेतील क्रांती चौकात या रॅलीचा समारोप होईल. त्यानंतर पाच फेब्रुवारीपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणासाचा निकाल विरोधात लागल्यास ६ फेब्रुवारीपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पत्रकार परिषदेस मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय सावंत गणेश उगले ,अमोल साळुंखे,प्रदीप नवले, दिव्या मराठे, अनिल कोंडके, सतीश जगताप, राहुल भोसले, संतोष गायकवाड,राजेंद्र गरड उपस्थित होते.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha To Be Held Torch Rally Aurangabad Latest News