मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा ‘धंदा’

मनोज साखरे
Sunday, 27 September 2020

- सिडको एन-चारमध्ये स्पा सेंटरवर छापा 
- दोघे ताब्यात, पीडितांची महिलागृहात रवानगी 

औरंगाबाद : सिडको एन-चार येथे एका इमारतीत एलोरा स्पा ॲण्ड वेलनेस बॉडी मसाज पार्लरमध्ये देहविक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार पुंडलिकनगर पोलिसांच्या छाप्यानंतर उघडकीस आला. यात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. तसेच पीडितांची रवानगी महिला सुधारगृहात केली. ही कारवाई आज (ता. २६) दुपारी दोन ते अडीचदरम्यान करण्यात आली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, स्पा चालक दत्तू माने, संदीप भालेराव, अमोल भालेराव (रा. सर्व नाशिक) यांच्यासह स्पामध्ये काम करणारे बबलू बाळकृष्ण इंगळे (वय ३२, रा. विजयनगर, नाशिक), आकाश राजू पगडे (वय २३, रा. मयूरपार्क) अशी संशयितांची नावे आहेत. यापैकी आकाश व बबलू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच दोन रिसेप्शनिस्ट तरुणींसह पीडितांना महिलागृहात पाठविण्यात आल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

संशयित दत्तू माने व त्याचे साथीदार स्पा नाशिक येथून चालवत होते. दोन तरुणी रिसेप्शनिस्ट म्हणून व दोन तरुण नोकर म्हणून त्यांनी ठेवले होते. दोन हजारांत मसाज केल्यानंतर ग्राहकांच्या मागणीनुसार देहविक्री केली जात होती. यासाठी दोन ते आठ हजारांचा भाव होता. विशेष म्हणजे संशय आल्यास ग्राहकांचे मोबाईलही काउंटरवर ताब्यात घेतले जात होते. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे, उपनिरीक्षक मीरा चव्हाण, विठ्ठल फरताळे, रमेश सांगळे, बाळाराम चौरे, प्रवीण मुळे, जालिंदर मांटे, रवी जाधव, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ, दीपक जाधव, विलास डोईफोडे, अजय कांबळे, नंदा गरड, माया उगले, कोमल तारे यांनी केली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मोबाईल ठेवायचे ताब्यात 
पुंडलिकनगर पोलिसांनी पंटरला पैसे देत स्पा पार्लरमध्ये कॉल करायला लावला. बॉडी मसाजसाठी त्याने मोबाईलवरून बुकिंग केली. स्पामध्ये गेल्यानंतर मसाजवेळी त्याने शरीरसुखासाठीही मागणी केली. या मागणीला तेथील महिलेने होकार दर्शविला व त्याचा मोबाईल काउंटरवरील एका व्यक्तीने स्वतःच्या ताब्यात ठेवला. 

इशारा देताच कारवाई 
स्पा पार्लरमध्ये देहविक्री होत असेल तर याची माहिती द्यायची असे पोलिसांनी पंटरला सांगितले होते. पण स्पामध्ये अशा ग्राहकांचा मोबाईल काहीवेळ ताब्यात घेतला जात होता. त्यामुळेच पोलिसांनी पंटरला गॅलरीतून डोक्याला हात लावून इशारा करायचे सांगितले होते. त्यानुसार पंटरने इशारा केला आणि पोलिसांनी कारवाई केली. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Massage parlor prostitution business Aurangabad crime news