सत्तेतल्या नेत्यांनो, वायफळ बडबड करू नका

शेखलाल शेख
Friday, 17 January 2020

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. हे सरकार टिकवायचे असेल तर या पक्षाच्या नेत्यांनी वायफळ बडबड न करता तोंडाला कुलुप लावायला पाहिजे.

औरंगाबादः सध्या राज्यात सुरु असलेले वाद, आरोप-प्रत्यारोप म्हणजे बिनपैशाचा तमाशा झालाय. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. हे सरकार टिकवायचे असेल तर या पक्षाच्या नेत्यांनी वायफळ बडबड न करता तोंडाला कुलुप लावायला पाहिजे. आहे असे मत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले. 

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करणारे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकात एकमेकांवर शाब्दीक हल्ले सुरु झाले आहे.

Image result for aaj ke shivaji

हेही वाचा : वंशाचा दिवा मुलगा नव्हे, मुलगी

भाजपच्या नेत्याने प्रसिध्द केलेले पुस्तक, त्यावरून उदयनराजे भोसले यांनी शिवसेना व भाजपच्या नेत्यांवर केलेली टिका, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उदयनराजे यांना छत्रपतींचे वशंज असल्याचा मागितलेला पुरावा आणि इंदिरा गांधी यांचे करीम लाला यांच्याशी जोडलेला संबंध या वरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातील आरोप प्रत्यारोप, खुलासे अजून ही सुरुच आहे. 

या वादावर एमआयएमचे खासदार प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हाच मी या तीन्ही पक्षातील माझ्या मित्रांना एक सल्ला दिला होता.

क्लिक करा : ती नगरहून फक्त या गोष्टीसाठी येत होती औरंगाबादेत

तुमचे सरकार जर टिकवायचे असेल तर माध्यमांसमोर बोलण्याचा मोह टाळा, वायफळ बडबड करू नका, अन्यथा हेच तुमचे सरकार कोसळण्याचे कारण ठरेल. परंतु या मित्रांनी माझा सल्ला फारसा मनावर घेतलेला दिसत नाही. 

राज्यात सध्या सुरू असलेला वाद आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती पाहता या सरकारला कामापेक्षा अशा वादांमध्येच जास्त रस असल्याचे दिसते. मी सध्या इंदूर येथे केंद्राच्या शहरी विकास समितीच्या दौऱ्यावर आहे. अनेक विकासकामांच्या चर्चा या बैठकांमधून होत आहे. त्यामुळे राज्यात काय चाललेय हे पाहण्यासाठी मला वेळच मिळाला नाही.

हेही वाचा : राजकारण थांबवा, विकासाचे काय ते बोला

छत्रपतींशी तुलना म्हणजे वेडेपणा 

छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान मोदी यांची भाजपच्या जयभगवान गोयल या लेखकाने केलेली तुलना म्हणजे शुध्द वेडेपणा आहे. शिवाजी महाराजांएवढी उंची कुणालाही गाठता येणार नाही. त्यामुळे गोयल यांनी हा आगाऊपणा का केला? कुणाच्या सांगण्यावरून केला का ? हे ही तपासले पाहिजे. माझ्या दृष्टीने हे वेडेपणाचे लक्षण असल्याची टिकाही इम्तियाज जलील यांनी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM Mp Imtiaaz Jaleel Political statement Current Situation Maharashtra News