स्मार्ट सिटी बसच्या महिला वाहकांशी गैरवर्तन, शिवसेना महिला आघाडीने जाब विचारताच प्रशासन नरमले

Aurangabad Smart City Women Conductors
Aurangabad Smart City Women Conductors

औरंगाबाद : स्मार्ट सिटीबसमधील प्रवाशांची तपासणी करणाऱ्याकडून महिला वाहकांशी गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. महिला वाहकांनी थेट शिवसेना महिला आघाडीकडे तक्रार केली. महिला आघाडीच्या मराठवाडा संपर्कप्रमुख आमदार डॉ. मनिषा कायंदे यांच्या नेतृत्वात शनिवारी (ता.२८) दुपारी स्मार्ट सिटीच्या कार्यालयात धडक देत सिटीबसचे व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांना जाब विचारला. यानंतर त्यांनी गैरवर्तन करणाऱ्या चेकरवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.


महिला वाहकांच्या तक्रारींची दखल घेत शिवसेनेच्या मराठवाडा संपर्कप्रमुख आमदार डॉ. मनिषा कायंदे यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या संपर्क संघटक कला ओझा, सहसंपर्क संघटक सुनिता आऊलवार, जिल्हा संघटक सुनिता देव, उपजिल्हासंघटक अंजली मांडवकर यांनी दुपारी थेट आमखास मैदानाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राजवळील स्मार्ट सिटीचे कार्यालय गाठले. महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने स्मार्ट सिटीबसचे व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांना तिकीट चेकरवर तातडीने कारवाई करण्याचा अग्रह धरला. त्यानंतर व्यवस्थापक भुसारी नरमले.


महिला वाहकांच्या पर्सची आणि गळयात असलेल्या तिकीट मशीनची तपासणी पुरुष तपासणीसांकडून केली जाते हे अत्यंत गंभीर आहे. स्मार्ट सिटीबस व्यवस्थापनाकडून मानसिक त्रास दिला जातो. हे शिवसेना महिला आघाडी खपवून घेणार नाही.
- डॉ.मनिषा कायंदे, आमदार

महिला वाहकांशी गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. पुरुष तिकीट चेकरकडून विनाकारण त्रास देवून त्यांच्याशी गैरवर्तन केले जात असले तर त्या तिकीट चेकरवर कठोर कारवाई होणारच.
- प्रशांत भुसारी, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक

 

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com