file photo
file photo

पोलिसच जाणार तक्रारदारांकडे (कुठे ते वाचा)

 औरंगाबाद : अनेक वेळा किरकोळ स्वरुपाच्या तक्रारी पोलिस ठाण्यापर्यंत येत नाहीत. त्यातूनच भविष्यात मोठा गुन्हा घडतो. म्हणून पोलिसच लोकांपर्यंत गेले तर छोट्या-छोट्या तक्रारींची जागेवरच सोडवणूक होईल. त्याचप्रमाणे शाळकरी मुली, महिलांशी संवाद साधणे सोपे जाईल. म्हणूनच नवीन वर्षात मोबाइल पोलिस ठाणे सुरू करण्यात येणार आहे, 

""महिलांना सुरक्षेचा प्रश्न सतत निर्माण होतो. त्यातच दूरच्या गावातील नागरिक, महिलांना पोलिस ठाण्यात येणे सोयीचे नसल्याने अनेक तक्रारी पोलिसांपर्यंत येत नाहीत. यापुढे सर्व तक्रारी पोलिसांपर्यंत आल्या पाहिजेत. त्यासाठी  औरंगाबाद पोलिस विभाग अतिशय सतर्क झाला आहे. नवीन वर्षात थेट लोकांशी संवादाचा सेतू तयार करण्यासाठी "मोबाईल पोलिस ठाणे' नावाची संपर्क यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. पाच हजार लोकसंख्या असलेले किंवा वर्षभरातच गंभीर गुन्ह्याच्या घटना घडलेले तसेच मोठा आठवडेबाजार भरत असलेल्या गावांमध्ये सुरवातीला ही यंत्रणा काम करेल. त्यानंतर हळूहळू छोट्या-छोट्या गावांमध्येही विस्तार केला जाईल. यात एक अधिकारी, तीन-चार कर्मचारी काम करतील. ते थेट गावात जाऊन तेथील तक्रार निवारणांसाठी कार्यवाही करतील. गरजेनुसार ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटील यांच्याशी संवाद साधून जागेवर तक्रार निवारण करण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहणार आहे. तक्रारीचे निवारण झाले नाही व तो गुन्ह्याचा प्रकार असेल तर संबंधित पोलिस ठाण्यात जाऊन ऑनलाइन गुन्हा नोंदविला जाईल. गावांमध्ये तक्रारी नसतील तर कायद्याबाबत जनजागृती करण्यात येईल. मुली, महिलांशी संवाद साधला जाईल'', 

पर्यटकांनाही होईल लाभ 

वेरूळ-अजिंठा लेणी, बिबी का मकबरा, पानचक्की, दौलताबाद किल्ला यासारख्या ऐतिहासासिक स्थळांचा वारसा असल्याने औरंगाबादला जागतिक तसेच देशातील अनेक पर्यटक येतात. त्यांनाही विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मोबाईल ठाणे ही यंत्रणा उपयुक्त ठरेल असा विश्‍वास श्रीमती पाटील यांनी व्यक्त केला. 

गावागावात महिलांशी संवाद 

शाळकरी मुली, तरुणींना सुरक्षेचा प्रश्न सतत भेडसावत असल्याने आपण पोलिस दादा, पोलिस दीदी, दामिनी ही पथके अधिक सतर्क केली आहेत. गावातील मुलींना बस, बसस्टॅंड, शाळा, कॉलेज आदी ठिकाणी काही अडचणी आहेत का? हे पाहण्यासाठी पोलिसांची पथके थेट बस, बसस्थानक, शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहे. कोणी त्रास देते का? असे थेट मुलींना विचारत असल्याने टवाळखोर या मार्गाला जात नाहीत. याशिवाय मुलांना सामाजिक, शैक्षणिक आणि वैयक्तिक आयुष्यात गुन्ह्याचा कसा तोटा आहे? हे समजावून सांगितले जाते. 

करमाड प्रकरणाची चौकशी सुरू 

शेंद्रा एमआयडीसीतील एका बड्या कंपनीतून मोठ्या प्रमाणात स्टील (लोखंड) चोरीला गेले होते. पाच ट्रकमधून हे लोखंड वाहून नेण्यात आले होते. यात करमाड पोलिसांशी मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार मोक्षदा पाटील यांच्याकडे आली होती. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कामाला लावून स्टील चोरी करणाऱ्या पाच ट्रक, एक कार, स्टील जप्त करून दोन संशयितांना अटक केली. यात करमाडचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अजिनाथ रायकर आणि दोन कर्मचाऱ्यांवर आरोप ठेवण्यात आला. त्यांची तत्काळ नियंत्रण कक्षात बदली केली. तसेच पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे यांच्यामार्फत चौकशीही सुरू केल्याची माहिती श्रीमती पाटील यांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com