
प्रेम व्यक्त करणं अवघड असते. पण, आपल्या जोडीदाराने अशा रीतीने प्रेम व्यक्त करावे की ते कायम आठवणीत राहील, अशी इच्छा सर्वांचीच असते. त्यामुळेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत प्रपोज करायची हटके पद्धत.
आज व्हेलेंटाइन डे. काहींनी आपल्या प्रेयस व्यक्तीला प्रेपोज डेच्याच दिवशी प्रपोज केले असेल. पण, आपले गूज तिला किंवा त्याला कसे सांगावे. सांगितले तर होकार मिळेल की नकार, अशी भीती अनेकांना असल्याने प्रपोज डेला ते आपले प्रेम व्यक्त करू शकले नाहीत. मात्र, जर वेळेवर प्रेम व्यक्त केले नाही तर तिला किंवा त्याला ते कसे कळणार? त्यामुळे वेळीच प्रपोज करा नाही तर पश्चाताप करण्याची वेळ येईल. जर समोरा-समोर प्रपोज करण्याचे धडस होत नसेल तर eSakal.com खास तुम्हाला हटके पद्धत सांगत आहे. त्या पद्धतीने प्रपोज केले तर तुम्हाला नकार मिळण्याची शक्यता कमीच आहे.
आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी पहिल्यांदा एक नवीन व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार करा. त्या ग्रुपला I LOVE किंवा I LOVE U असे नाव द्या.
ग्रुप तयार केल्यानंतर ज्या व्यक्तीला तुम्हाला प्रपोज करायचे आहे केवळ तिला किंवा त्याला त्यामध्ये अॅड करा.
हेही वाचा - आदित्य ठाकरे यांचं औरंगाबादेत मोठं वक्तव्य
हेही वाचा - राज ठाकरे असे अडकले - वाचा
संबंधित व्यक्ती ग्रुपमध्ये अॅड झाल्यानंतर तुम्ही ग्रुममधून बाहेर पडा. त्यानंतर त्या ग्रुपमध्ये केवळ ती व्यक्ती एकटीच राहील आणि तिला आय लव्ह यू हा तुमचा मेसेज मिळेल.