आदिवासी कामगार-विद्यार्थ्यांसाठी फोन खणखणला अन्..

शेखलाल शेख
Thursday, 7 May 2020

१३४ कामगार व विद्यार्थी यांना घेऊन जाण्यासाठी ८ खाजगी बसेसचे नियोजन करण्यात आले. ५२ आसन व्यवस्था असलेल्या बस मध्ये २१ व २० आसन व्यवस्था असलेल्या बस मध्ये १० लोकांनाच बसविल्या गेले. प्रत्येकाला मास्क, एक सॅनिटायझरची बाटली, प्रत्येकाला जेवणाचे पॅक केलेले पाकीट, पाण्याच्या बॉटलचे वाटप करण्यात आले. 

औरंगाबादः शहर आणि औद्योगिक वसाहतीत नंदुरबार येथील १३४ आदिवासी, कामगार लॉकडाऊनमध्ये अकडले होते. या सर्वांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबादच्या मदतीने गुरुवार (ता.७) सकाळी ११ वाजता आठ बसेसच्या माध्यमातून नंदुरबारकडे पाठविण्यात आले. यामध्ये १३४ विद्यार्थी, ८ ड्रायव्हर, २ कार्यालयाचे कर्मचारी अशा १४४ जण यांचा समावेश आहे. 

१३४ कामगार व विद्यार्थी यांना घेऊन जाण्यासाठी ८ खाजगी बसेसचे नियोजन करण्यात आले. ५२ आसन व्यवस्था असलेल्या बस मध्ये २१ व २० आसन व्यवस्था असलेल्या बस मध्ये १० लोकांनाच बसविल्या गेले. प्रत्येकाला मास्क, एक सॅनिटायझरची बाटली, प्रत्येकाला जेवणाचे पॅक केलेले पाकीट, पाण्याच्या बॉटलचे वाटप करण्यात आले. 

औरंगाबाद परिसरातील औद्योगिक वसाहतीत व शहरात काही कामगार व विद्यार्थी अडकलेले आहेत अशी माहिती आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या कार्यालयाकडून औरंगाबादचे प्रकल्प अधिकारी दिलीप खोकले यांना देण्यात आली. कार्यालयाकडून प्राप्त नावे व औरंगाबाद प्रकल्प कार्यलयात प्राप्त नावे असे १३४ कामगार व विद्यार्थी यांची यादी प्रकल्प कार्यालयाने तयार केली.

हेही वाचा- तुमच्या गाडीमुळं कोरोनो होईल गल्लीत आणू नका

प्रकल्प अधिकारी यांनी यादीतील प्रत्येकाला संपर्क करण्यासाठी कार्यालय स्तरावर ५ समित्या निर्माण केल्या. समितीने प्रत्येकाला संपर्क करून सोबत असलेले व्यक्ती, लहान मुले यांच्या वया सहित, जेथे जायचे आहे तेथील पत्यासहित व संपर्क क्रमांक असलेली एक अद्ययावत यादी पुनः तयार केली. अद्ययावत यादीतील आदिवासी बांधवाना समितीतील सदस्यांनी पुन्हा संपर्क करून त्यांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मदत केली. 

भागवत कदम, विलास कटारे यांनी एमआयडीसीमध्ये प्रमाणपत्रासाठी वैदकीय शिबिर घेऊन सर्वांचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवले. सर्वांचे वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर पुन्हा वैद्यकीय प्रमाणपत्र असलेले व नसलेले यांची यादी कार्यालयात तयार केली. प्रवासाचा पास मिळवण्यासाठीचे संपूर्ण कागदपत्र व्हाट्सएपच्या माध्यमातून समितीने मिळविले त्याचे एक एक प्रत काढून नवीन यादी बनवून औरंगाबादच्या पोलीस आयुक्त करायला सादर करून त्याचा दोन दिवसात युद्धपातळीवर पाठपुरावा करून दिनांक ६ मे ला सायंकाळी ६ वाजता १३४ लोकांचा पास मिळाला. सदर पास मिळवण्यासाठी प्रकल्प अधिकारी श्दिलीप खोकले व सहा. प्रकल्प अधिकारी डॉ. उद्धव वायाळ, उल्हास चव्हाण, संतोष चव्हाण, चंद्रकांत गोटे यांनी विशेष परिश्रम घेतले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nandurbar Student Worker Help Aurangabad News