औरंगाबादेत रंगणार राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धा

Moot Court News
Moot Court News

औरंगाबाद : माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयात शनिवारी (ता.11) व रविवारी (ता.12) 20 व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धा होणार आहे. यात देशातील विविध 22 विधी महाविद्यालये व विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत. यात चेन्नई, बंगळूर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, जळगाव, सांगली, मुंबई, नगर, नाशिक, संगमनेर, औरंगाबाद येथील संघांचा समावेश आहे, अशी माहिती स्पर्धा समन्वयक प्रा. पी. आर. गिरबने यांनी गुरुवारी (ता. नऊ) पत्रकार परिषदेत दिली. 

शनिवारी सकाळी नऊ वाजता महाविद्यालयात या स्पर्धेची प्राथमिक फेरी, तर रविवारी सकाळी नऊ वाजता एम. एल. ऍण्ड जी. ई. सोसायटीच्या तापडिया नाट्यमंदिरात अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. स्पर्धेसाठीच्या पहिल्या फेरीचा काल्पनिक खटला हा दयानंद विधी महाविद्यालय, सोलापूर येथील प्रेरणा चव्हाण आणि राजेश्‍वरी फटाटे या विद्यार्थिनींनी तयार केला आहे. तो हिंदवी या देशातील आईसलॅंड या विशेष दर्जा असलेल्या राज्याचे पुनर्गठन करून निर्माण केलेल्या केंद्र शासित प्रदेशाच्या कायद्यावर आधारित आहे. या प्रकरणात त्या देशातील अनुच्छेद 370 रद्द केल्यामुळे काय परिणाम होतील. यावर देशभरातून आलेले संघ युक्तीवाद सादर करतील. यातून पाच संघ निवडले जातील.

हा आहे विषय 

अंतिम फेरीतील प्रकरण दयानंद विधी महाविद्यालयातील (सोलापूर) झीनत शेख विद्यार्थिनीने तयार केले आहे. त्यात इंडिका या देशातील गैरकृत्य रोखण्यासाठी असलेल्या कायद्यात सरकारने केलेल्या सुधारणा. या सुधारणांमुळे नागरिकांना अतिरेकी समजून सरकार त्यांच्या मूलभूत अधिकारांवर बाधा आणेल या भीतीतून दाखल जनहित याचिकेवर पाच संघ युक्तीवाद करतील. प्रथम फेरीचे परीक्षण उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विविज्ञ ऍड. संजीव देशपांडे, ऍड. प्रवीण मंडलिक, ऍड. किशोर संत, ऍड. व्ही. डी. सपकाळ, ऍड. अंजली दुबे, ऍड. राजेंद्र गोडबोले, ऍड. अजित कडेठाणकर, ऍड. पी. आर. कातनेश्‍वरकर, ऍड.शैलेश ब्राह्मे, ऍड. रश्‍मी कुलकर्णी करणार आहेत. अंतिम फेरीचे परीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव आणि न्यायमूर्ती विभा कंकणवाडी करणार आहेत. पत्रकार परिषदेला प्राचार्य. डॉ. एस. जी. शिरसाठ, डॉ. अपर्णा कोत्तापल्ले, डॉ. श्रीकिशन मोरे यांची उपस्थिती होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com