वीजबिल ऑनलाइनच भरा : महावितरण

अनिलकुमार जमधडे
Sunday, 3 May 2020

महावितरणचे वीजग्राहकांना आवाहन 

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मीटर रीडिंग, वीजबिल वाटप व वीजबिल भरणा केंद्रे महावितरणने तात्पुरती बंद केली आहेत; मात्र महावितरण मोबाईल ॲप किंवा वेबसाइटवर आपले वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहकांनी त्याचा लाभ घेऊन वीजबिल ऑनलाइन भरावे, असे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे. 

बिलाच्या रकमेत सुट 

महावितरणने वीज ग्राहकांच्या वेळ, श्रम व पैशांची बचत करीत घरबसल्या www.mahadiscom.in व मोबाईल ॲपच्या माध्यमातून वीजविषयक सुविधा एका क्लिकवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ग्राहकांना सहजसोप्या पद्धतीने नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, यूपीआयद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा निःशुल्क उपलब्ध आहे. विहित कालमर्यादेत बिल भरल्यास ग्राहकांना प्रॉम्प्ट पेमेंट डिस्काउंट तसेच; ऑनलाइन बिल भरल्यामुळे बिलाच्या रकमेत ०.२५ टक्के सूट दिली जाते. ज्या ग्राहकांनी मीटर रीडिंग नोंदविले नाही त्यांना सरासरी वीजवापराचे बिल पाठविले जात आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

स्वत:च नोंदवा रिडींग

ग्राहकांना महावितरण ॲप गुगल प्ले स्टोअर https://play.google.com/store/apps/details?id=com.msedcl.app या लिंकवरून वा ॲप स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल. ॲप डाऊनलोड केल्यानंतर गेस्ट युजर म्हणून ते वापरता येईल. लॉग-इन करण्यासाठी वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल नोंद करणे आवश्यक आहे. महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’ पाठविण्यात येत आहे. ज्या ग्राहकांना ‘एसएमएस’ प्राप्त नाही असे ग्राहक मागील महिन्यातील उपलब्ध वीज बिलावरील मीटर रीडिंगची तारीख पाहून त्या तारखेपासून पाच दिवसांत आपले रीडिंग ॲपद्वारे नोंदवू शकतात. ग्राहकांनी आपल्या वीज मीटरवरील केडब्लूएच युनिट असलेले अंक नोंदवून वीज मीटरचा फोटोही ॲपवर अपलोड करायचा आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

 

अशी करा नोंदणी 

मोबाईल क्रमांक नोंदविण्यासाठी ग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG <बारा अंकी ग्राहक क्रमांक > टाईप करून ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठवावा किंवा महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर https://consumerinfo.mahadiscom.in/ या लिंकवर किंवा ॲपवरूनही नोंदणी करता येईल. ग्राहकांना वीजबिलाचा एसएमएस पाठविला जात आहे. वीजबिल वेबसाइट किंवा ॲपवर पाहता येईल. 
ग्राहकांनी खंडित वीजपुरवठ्याच्या तक्रारीसाठी आपल्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर मिसकॉल द्यावा अथवा NOPOWER <ग्राहक क्रमांक> हा एसएमएस ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठवावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About Mahavitran Aurangabad