CoronaVirus : अवाच्या सव्वा बिले, डोळे विस्फारले! 

photo
photo

औरंगाबाद ः लॉकडाउनमधून नागरिक काहीसे सावरत असतानाच महावितरणने बीज बिलांचा शॉक दिला आहे. कोरोना संसर्गामुळे प्रत्यक्ष रीडिंग घेणे बंद आहे. महावितरणकडे नागरिकांनीच रीडिंग पाठवण्याची सोय आहे. मात्र याबद्दल फारशी जागरूकता नाही, त्यामुळे महावितरणने एप्रिलची सरासरी बिले पाठविली आहेत. मात्र, बिले पाहून नागरिकांनाच ‘शॉक’ बसला. असे असले तरीही प्रत्यक्ष रीडिंग घेतल्यानंतर याची दुरुस्ती होणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे. 

स्वतःच पाठवता येते रीडिंग 

महावितरणचे ॲप डाउनलोड करून ग्राहकांना स्वतःच रीडिंग पाठवता येते; मात्र याबद्दल जनजागृतीचा अभाव आहे. अनेकांना हे जमतही नाही. त्यामुळे बरेचजण महावितरणला रीडिंग पाठवत नाहीत. अशा प्रकरणात महावितरणने ग्राहकांच्या गेल्या तीन महिन्यांच्या सरासरीनुसार बिल देण्याचे धोरण ठरवलेले आहे; मात्र अशी बिले जास्तीची असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

वाढीव बिले कायम राहतील 

लॉकडाउनमुळे सर्व नागरिक घरांमध्ये आहेत, त्यामुळेच सर्व पंखे, कूलर, टीव्ही, फ्रीज व अन्य सर्वच विजेची उपकरणे सुरू आहेत. त्यामुळे विजेची प्रत्यक्ष बिले वाढणारच आहेत. महावितरणच्या सध्याच्या सरासरी धोरणानुसार बिले वाढून आल्याचे वाटत असले तरीही आणि प्रत्यक्ष रीडिंग घेतल्यानंतरही विजेचा वाढीव वापर आढळल्यास बिले करेक्शन होतील; मात्र ती वाढलेलीच असतील, असे सूत्रांनी सांगितले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तीन लाख ग्राहकांनी पाठवले रीडिंग 

महावितरणकडे राज्यातील तीन लाख ६३ हजार वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अॅपद्वारे एप्रिल महिन्याचे स्वतःहून मीटर रीडिंग पाठविले आहे. त्यामध्ये औरंगाबाद परिमंडळातील म्हणजे औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांतील तब्बल १६ हजार ३७४ ग्राहकांचा समावेश आहे. या ग्राहकांना करेक्ट बिले पाठवली आहेत; मात्र याशिवाय रीडिंग न पाठवलेल्या नागरिकांना सरासरीचे बिले आहेत. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

अशी पाठवा रीडिंग 

महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट व ‘महावितरण’ मोबाईल अॅपद्वारे वीजग्राहकांना मीटरच्या रीडिंगचे फोटो पाठवून स्वतः रीडिंग घेता येते. वीजग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाईलवर महावितरणकडून ‘एसएमएस’ पाठविला जातो. त्यात मीटर रीडिंग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात येते. याशिवाय बिलावर रीडिंग घेण्याची तारीख नमूद आहे. त्‍या तारखेपासून पाच दिवसांपर्यंत रीडिंग पाठवता येते. 

 
महावितरणने ज्यांनी रीडिंग पाठवली नाही, त्यांना सरासरी बिले दिली आहेत. प्रत्यक्ष रीडिंग घेतल्यानंतर नागरिकांचे बिले आपोआप दुरुस्त होतील. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, नागरिकांना ऑनलाइन तक्रारी नोंदवता येतात. त्यानुसार त्यांचे निरसन करता येईल. 
-सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, औरंगाबाद परिमंडळ.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com