रेल्वेने पळालेले शोधले सातशे सैराट 

photo
photo

औरंगाबाद : विविध कारणांसाठी घरातून पळुन गेलेल्या तब्बल 700 मुला मुलींना तेरा वर्षात शोधण्यात यश आले. रविवारी (ता. 26) रोजी सातशेव्या अल्पवयीन मुलांना रेल्वे सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा आपल्या कुटूंबीयांच्या स्वाधीन केले. आतपर्यंतच्या घटनांमध्ये अनेक विवाह इच्छुक जोडप्यांचाही सामावेश आहे. 

अल्पवयीन मुले सापडले 

बिडकीन येथील दोन अल्पवयीन मुले शनिवारी (ता. 25) रात्री नागपूर- मुंबई (नंदीग्राम एक्‍सप्रेस) मधून मुंबईकडे निघाले होते. त्यांच्या एकुणच हालचालवरुन बळावलेल्या संशयावरुन त्यांना रेल्वे प्रवाशी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी लासुर स्टेशन येथे ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्यांच्या कुटूंबीयांपर्यंत पोहचवले. बीडकीनच्या मुलांची ही सातशेवी घटना असल्याचे संतोष सोमाणी यांनी सांगीतले. 

जोडप्यांचाही सामावेश 

दरम्यान घरातून पळून जाणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा आणि विवाह इच्छुक जोडप्यांचा सामावेश असतो. घरातून पळून गेलेले बहुतांश जण रेल्वे मार्गाने निसटण्याचा प्रयत्न करतात. रेल्वे मार्ग कमी खर्चाचा बराच वेळा विनातिकीट प्रवासही करणे शक्‍य होते. त्यामुळेच पळुन जाणारे बहुतांशजण रेल्वे मार्गाचा पर्याय निवडत असल्याचे वारंवारच्या घटनेवरुन लक्षात येते. 

रेल्वे सेनेच योगदान 

रेल्वेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी संतोषकुमार सोमाणी यांनी रेल्वे प्रवाशी सेनेची स्थापना केली. त्यांनी रेल्वेच्या प्रश्‍नाबरोबरच विधायक कामांवरीही अधिक लक्ष दिले आहेत. त्याचाच भाग म्हणून घरातून पळून गेलेले आणि रेल्वेत सापडलेल्या सातशे जणांना श्री. सोमाणी यांनी आपल्या कुटूंबीयांच्या स्वाधीन केले. आतापर्यंतच्या घटनांमध्ये विवाह करण्याच्या उद्देशाने घरातून पळालेल्या विवाहइच्छुक जोडप्यांचाही सामावेश आहे. 

यांची झाली मदत 

आतापर्यंतच्या मोहिमेत लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा बल, महाराष्ट्र पोलिस, रेल्वे सेना पदाधिकारी, रेल्वे सेना सदस्य, रेल्वे सेना गोल्डन ग्रुप, खबर पक्की ग्रुप तसेच रेल्वे नागपूर, औरंगाबाद रेल्वे पोलीस , रेल्वे सुरक्षा बल, नांदेड मंडळ रेल्वे नियंत्रण कक्ष, विविध ठिकाणचे रेल्वे स्टेशन मास्तर, रेल्वेतील टीटीई, महाराष्ट्र पोलीस शहर व ग्रामीण अशा सर्वच यंत्रणांची मदत झाल्याचे संतोषकुमार सोमणी यांनी सांगीतले. 

रेल्वेतून पळालेल्यांची माहिती मिळाल्यानंतर किंवा संशयास्पद आढळलेल्या सातशे जणांना योग्य मदत करुन पोलिस आणि रेल्वे यंत्रणेच्या मदतीने सुरक्षितपणे घरापर्यंत सोडण्याचे काम केले. यातुन मिळणारा आनंद मोठा आहे. 
संतोषकुमार सोमाणी (अध्यक्ष रेल्वे प्रवाशी सेना) 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com