एसटीचे टोचन तुटले, अपघात टळला 

अनिल जमधडे
सोमवार, 13 जानेवारी 2020

औरंगाबाद : एसटी महामंडळाची बंद पडलेली बस वर्कशॉपपर्यंत आणताना एसटी कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. बंद पडलेल्या एसटीला लावलेले टोचन दोनवेळा तुटल्याने कर्मचारी हतबल झाले होते. एसटीच्या गलथान कारभाराचा फटका कर्मचाऱ्यांना सहन करावा लागला. 
एसटी महामंडळातील एसटीसाठी पुरवले जात असलेले सुटे भाग हा नेहमीच चर्चेचा विषय आहे. अस्सल सुटे भाग मिळत नसल्याने एसटी बंद पडण्याच्या घटना वाढत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. 

औरंगाबाद : एसटी महामंडळाची बंद पडलेली बस वर्कशॉपपर्यंत आणताना एसटी कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. बंद पडलेल्या एसटीला लावलेले टोचन दोनवेळा तुटल्याने कर्मचारी हतबल झाले होते. एसटीच्या गलथान कारभाराचा फटका कर्मचाऱ्यांना सहन करावा लागला. 
एसटी महामंडळातील एसटीसाठी पुरवले जात असलेले सुटे भाग हा नेहमीच चर्चेचा विषय आहे. अस्सल सुटे भाग मिळत नसल्याने एसटी बंद पडण्याच्या घटना वाढत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. 

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   

बस पडली बंद 

रविवारी (ता. 12) एसटी महामंडळाची अंबेजोगाई (जि. बीड) आगाराची एसटी बस औरंगाबाद- बीड मागावरील आडूळ (ता. पैठण) जवळ बंद पडली. त्यामुळे विभागीय कार्यशाळेचे पथक बंद पडलेल्या बसला आणण्यासाठी दुसरी दुरुस्तीची बस घेऊन गेले; मात्र बंद पडलेली बस सुरू होत नसल्याने तिला कार्यशाळेपर्यंत आणणे भाग होते. म्हणून कर्मचाऱ्यांनी बंद पडलेल्या गाडीला टोचन लावले; मात्र टोचनही दोनवेळा तुटल्याने कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक झाली. 

शहरात पुन्हा टोचन तुटले 

शहरात आल्यानंतर सेव्हन हिल पुलाच्या जवळ बसचे टोचन दुसऱ्यांदा तुटले. ऐन वाहतुकीत टोचन तुटले. ऐन वाहतुकीच्या गर्दीत टोचन तुटल्याने रस्त्यावर वाहतूकीचा खोळंबा झाला. तातडीने वाहतुक पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर नागरीकांच्या मदतीने बंद पडलेली बस रस्त्याच्या कडेला घेतली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा तुटलेले टोचन जोडून बसला एसटीच्या विभागीय कार्यशाळेपर्यंत बसला नेले. 

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

एसटीचा गलथान कारभार 

एसटी महामंडळाचा गलथान कारभार सर्वश्रुत आहे. गेल्याच आठवड्यात औरंगाबाद आगार क्र. दोन मध्ये एसटी बसला जॅक लावताना जॅक स्लीप झाला, परिणामी दोन कर्मचारी एसटीखाली दबल्याने गंभीर जखमी झाले होते. एसटीच्या कार्यशाळेत आणि आगारांमध्ये काम करताना कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एसटीच्या देखभाल दुरुस्तीसाठी आवश्‍यक साधने जुनाट झालेली आहेत. अनेक पान्हे जुने झाल्याने ते स्लिप होण्याचे प्रकार होतात, परिणामी कर्मचाऱ्यांना लहान मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. 

जुगाड टेक्‍नॉलॉजी 

एसटी बंद पडल्यानंतर तील ओढून आणण्यासाठी लागणारे क्रेन एसटीकडे नाही. त्यामुळेच एसटीला दुसरा रॉड जोडून एसटी बस ओढून आणावी लागते. एसटी ओढून आणताना रस्त्यातील वाहतूकीचे प्रचंड अथडळे निर्माण होतात. विशेष टोचन करुन बस आणताना अपघात होण्याची शक्‍यता अधिक असते. तरीही एसटी महामंडळात वर्षानुवर्ष अशाच जुगाड टेक्‍नॉलॉजीने टोचन करुन बसला आणावे लागत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About St Bus Aurangabad