एसटी बसस्थानकावर रविवारीच अचानक का वाढली गर्दी?

अनिल जमधडे
रविवार, 15 मार्च 2020

औरंगाबाद : जगभरात थैमान घातलेल्या कोरुन विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्याचे परिणाम थेट शहरात जाणवण्यास सुरवात झाली आहे. दोन दिवस एसटीच्या बसगाड्यांवर विपरित परिणाम झाला होता. मात्र रविवारी (ता. सोळा) एसटीच्या मध्यवर्ती बसस्थानकावर अचानक गर्दी वाढली. शासनाने शाळा महाविद्यालयांना सुट्या जाहिर केल्याने गावी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने एसटीला अतिरिक्त बसगाड्या सोडाव्या लागल्या आहेत. 

औरंगाबाद : जगभरात थैमान घातलेल्या कोरुन विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्याचे परिणाम थेट शहरात जाणवण्यास सुरवात झाली आहे. दोन दिवस एसटीच्या बसगाड्यांवर विपरित परिणाम झाला होता. मात्र रविवारी (ता. सोळा) एसटीच्या मध्यवर्ती बसस्थानकावर अचानक गर्दी वाढली. शासनाने शाळा महाविद्यालयांना सुट्या जाहिर केल्याने गावी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने एसटीला अतिरिक्त बसगाड्या सोडाव्या लागल्या आहेत. 

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य शासनाने शाळा-महाविद्यालयांना सुट्टी ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर केली. त्यातच औरंगाबाद शहरात कोरोनाचा रुग्ण पाँझिटीव्ह आढळुन आला. त्यामुळेच नागरीकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. एसटीला शुक्रवार (ता. तेरा) आणि शनिवारी (ता. १४) मध्यवर्ती बस स्थानकावरून पुणे मार्गावरील शिवशाहीच्या अठरा फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. रविवारी (ता. १५)मात्र अचानक परिस्थिती बदलली. शाळा-महाविद्यालयांना दिलेली सुट्टी शहरात आढळलेला रुग्ण यामुळे मध्यवर्ती बस स्थानक आणि सिडको बसस्थानकावर अचानक गर्दी वाढली. 

औरंगाबादेत कोरोना कन्फर्म : महिलेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु

अचानक वाढली गर्दी

शिक्षण तसेच व्यापार, व्यावसाय आणि विविध कारणांनी शहरात राहणाऱ्यांची गावी जाण्यासाठी लगबग सुरु झाली. त्यामुळेच दोन दिवस रोडावलेली प्रवाशी संख्या वाढल्याने जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन एसटीच्या अधिकाऱ्यांना करावे लागले. एसटी महामंडळाच्या सिडको बस स्थानकातून सोलापूर, अकोला, लातूर, उस्मानाबाद यासह दहा विविध शहरांसाठी जाणाऱ्या अतिरिक्त बस गाड्या सोडाव्या लागल्या, हीच परिस्थिती मध्यवर्ती बसस्थानकावर देखील होती. दोन दिवसापुर्वी रद्द कराव्या लागलेल्या शिवशाही बसगाड्या पुन्हा सोडण्यात आल्या. एसटीच्या बसगाड्यांवर गेल्या दोन-तीन दिवसांपासून परिणाम दिसत होता, ही परिस्थिती सुधारुन गर्दीत वाढ झाली. 

लोक ऐकेनात : आफवांच्या बाजारात मटणावर उड्या

एसटीच्या विभागप्रमुखांना सुचना 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा विषाणू संसर्गजन्य असल्याने राज्य सरकारने सूचना दिल्या आहेत. कोरोनाचा गर्दीच्या ठिकाणी प्रसार होण्याची भीती अधिक आहे. त्यामुळेच त्याचा प्रसार होऊ नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, शक्यतो प्रवास करू नये, सभा- यात्रांचे आयोजन करू नये, पर्यटनाचे कार्यक्रम रद्द कराव्यात अशा विविध सूचना राज्य सरकारने दिलेल्या आहेत. त्यामुळेच प्रवास टाळण्याकडे लोकांचा कल दिसत आहे. या पार्श्वभूमिवर बसस्थानकावरील गर्दी आणि प्रवाशांच्या संख्येत आढावा घेऊन आवश्यकतेनुसार दैनंदिन वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचना एसटी महामंडळातर्फे देण्यात आल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About St Busstand Aurangabad