SUNDAY_POSITIVE : ती होती निराधार, त्याने दिला आयुष्यभराचा आधार

मधुकर कांबळे
रविवार, 19 जानेवारी 2020

सख्खे कुणीही नव्हते; पण तारुण्याच्या वळणावर भावी आयुष्याचा जोडीदार मिळाला. लग्नगाठ जुळली नि त्याच्या रूपाने तिला आप्तेष्ट भेटला.

औरंगाबाद - कोण आप्तेष्ट अन्‌ कोण रक्ताचं हेही तिला माहीत नव्हतं; पण बालिकाआश्रमात सांभाळ झाला. लहानाची मोठीही झाली. परिस्थितीच्या अंधकारात 'आशा' वाढली. चांगले शिक्षणही घेतले. सख्खे कुणीही नव्हते; पण तारुण्याच्या वळणावर भावी आयुष्याचा जोडीदार मिळाला. लग्नगाठ जुळली नि त्याच्या रूपाने तिला आप्तेष्ट भेटला. त्याच्या जीवनातही नवचेतनांची आशा जागी झाली. निमित्त होते भगवानबाबा बालिकाआश्रमातील आशा आणि वर्कशॉप चालविणाऱ्या नितीनच्या लग्नाचे. 


लग्नातील एक क्षण

आई-वडील कोण हे न कळणाऱ्या वयात ती भारतीय समाजसेवा केंद्रात दाखल झाली होती. सहा वर्षांची असताना आशा बालिकाआश्रमात आली. बालिकाआश्रमातच वाढली व आता ती बारावीचे शिक्षण पूर्ण करीत आहे. याच बालिकाआश्रमाच्या परिसरात पळसवाडी (ता. खुलताबाद) येथील नितीन ठेंगडे हा तरुण त्याचे भाऊजी सतीश साबळे यांच्या साई फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये काम करतो. सेवा म्हणून बालिकाआश्रमातील कामे वर्कशॉपच्या माध्यमातून सतीश साबळे व नितीन ठेंगडे करून देतात. तिथे नितीनच्या पाहण्यात आशा आली. 

जाणून घ्या - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या पिढीत सध्या कोण काय करतेय, वाचा...

भाऊजीकडे केली इच्छा व्यक्त

नितीनने ही बाब त्याने भाऊजी सतीश यांच्या कानावर घातली. सतीश यांनी नितीनचे भाऊ प्रमोद ठेंगडे यांच्याशी या स्थळाबाबत चर्चा केली. त्यांच्यातील सहमतीतून विषय
बालिकाआश्रमाच्या संचालिका कविता वाघ यांच्यापर्यंत नेण्यात आला. त्यांनीही सकारात्मकता दर्शविल्यानंतर नितीन व आशाची आपसात चर्चा झाली. दोघांत पसंतीही झाल्यानंतर त्यांच्या लग्नाचा योग जुळून आल्याचे सतीश यांनी सांगितले. शनिवारी (ता.18) नितीन व आशा हिचा बालिकाआश्रमात थाटात विवाह पार पडला. 

 

मला बहीण नसल्याने आईलाही मुलगी हवी होती. जीव लावावा असे कुणी नव्हते. आशाला प्रेम मिळेल. तिला आई-वडिलांची आठवण येऊ नये म्हणून मी तिची निवड केली. 
- नितीन ठेंगडे.  

 

वयाच्या सहाव्या वर्षांपासून आशा बालिकाआश्रमात राहत होती. तिचे अठरा वर्षे पूर्ण झाले असून, तिचे पालकत्व मी स्वीकारले आहे. तिला हक्काचे घर मिळावे म्हणून मुलगा शोधला. तो परिचयातीलच आहे. तिच्या भविष्याबद्दल तोही जागरूक आहे. 
- कविता वाघ, संचालिका भगवानबाबा बालिकाआश्रम 
 

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल
 

उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Thengale Weds Orphan girl in Aurangabad