संचारबंदीत ना नफा ना तोटा तत्वावर घरपोच भाजीपाला 

file photo
file photo

औरंगाबाद - कोरोनामुळे ओढावलेल्या संकटामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शिवसेनेचे नगरसेवक राजू वैद्य यांच्या सौजन्याने ना नफा ना तोटा तत्वावर घरपोच भाजीपाला पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

कोरोनाशी लढण्यासाठी संचारबंदी लागु करण्यात आली आहे. याकाळात लोकांनी भाजीपाला आणण्यासाठी घराबाहेर पडू नये आणि विनाकारण गर्दी करुन कोरोनाची साथ अटोक्यात आणण्याच्या प्रयत्नाना अडसर ठरु नये या हेतुने शिवसेनेचे पुर्व विधानसभा संघटक तथा नगरसेवक राजू वैद्य यांच्या सौजन्याने संकटकाळी सर्व सामन्याला मदत म्हणुन घरपोच भाजीपाला उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण या शिकवणुकीनुसार जनतेला घरपोच दिला जात आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचा शेतमाल खराब होऊ नये यासाठी भाजीपाला थेट शेतऱ्यांकडून विकत घेतला जात आहे. 

शेतकरी ते ग्राहक ना नफा ना तोटा या तत्वावर भाजीपाला घरपोच सेवा देण्यात येईल . घरपोच भाजीपाला घेण्यासाठी अखिल शेख -८६५७७७७२७७ , संदीप पाथरूड-८०८७२७३०५०, शकील शेख-८७८८३१५८३१ या क्रमांकावर संपर्क करावा.

श्री वैद्य यांनी सांगीतले, सध्या विद्यानगर वॉर्डात घरपोच भाजीपाला पुरवठा केला जात आहे. मागणी आल्यास अन्या भागातही ही सेवा पुरवली जाईल. याशिवाय मोफत घरपोच सेवा, अत्यावश्यक सेवा, हॉस्पिटल, मेडिकल व पोलीस संदर्भात काहीही सेवा असल्यास संपर्क साधावा असे आवाहन केले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  




 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com