
औरंगाबाद येथे शुक्रवारी ता.३१ पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊनला तीव्र विरोध दर्शवत आता लोकांनी आपले जनजीवन पुर्वीसारखे सुरळीत करण्यासाठी बाहेर पडावे, असे आवाहन केले.
औरंगाबाद : लॉकडाऊनला आता आमचा पाठिंबा नाही, राखी पौर्णिमेच्या दिवशी लोकांनी आता आम्हाला लॉकडाऊन नको असे मानून आपापल्या घरावर, गॅलरीत तुम्ही ज्या झेंड्याला मानत असाल किंवा राष्ट्राचा तिरंगा झेंडा लावावा. आणि कोरोनाला आम्ही हरविले आहे. आम्हाला लॉकडाऊन पुर्वीचे जनजीवन जगू द्या, असा संदेश सरकारला द्यावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...
औरंगाबाद येथे शुक्रवारी ता.३१ पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊनला तीव्र विरोध दर्शवत आता लोकांनी आपले जनजीवन पुर्वीसारखे सुरळीत करण्यासाठी बाहेर पडावे, असे आवाहन केले.
बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका
आंबेडकर म्हणाले, कोरोनामुळे चार महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम भयंकर आहे. लोकांवर उपासमारीची वेळ आली. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ पाच टक्के लोकांना कोरोनाचा धोका अधिक आहे, त्यामुळे त्यांच्यावर लक्ष केंद्रीत त्यांना सर्व प्रकारचे उपचार दिले पाहिजेत. पण त्यासाठी ९५ टक्के नागरिकांना का वेठीस धरले जात आहे. केंद्र व राज्यातील सरकार लॉकडाऊनच्या चक्रामध्ये अडकले आहे. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी आता जनतेनेच सरकारला मार्ग दाखवावा.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
उद्या ईद आहे, मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देतो, जशी ईद ते आधी साजरी करत होते, तशीच आताही साजरी करावी. तीन तारखेला राखी पौर्णिमा देखील आहे, त्यामुळे सरकारने आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करून लोकांना सण साजरे करू द्यावेत. रिक्षा, दुकाने, टपऱ्या बस अशा सगळ्याच प्रकारच्या व्यवस्था आता पहिल्या प्रमाणे निर्माण व्हायला पाहिजेत.
Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम
म्हणून लॉकडाऊनला पाठींबा नाही
लाकडाऊनमुळे राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. ती रुळावर आणण्याची जबादारी सरकारची नाही, तर लोकांचीच आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन पाळू नका, दुकाने, व्यवहार, उद्योग सुरू करा. स्वतःला वाचवण्यासाठी सरकारच्या नियमांचे पालन करून जनजीवन सुरळीत करावेच लागेल. म्हणून आमचा लॉकडाऊनला यापुढे पाठिंबा असणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
(संपादन- प्रताप अवचार)