CoronaUpdate : औरंगाबादेत २५७ कोरोनाबाधित, जिल्ह्यात आता रुग्णसंख्या ३६ हजारांवर

मनोज साखरे
Sunday, 18 October 2020

औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी (ता.१७) २५७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३६ हजार ४५६ झाली.

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी (ता.१७) २५७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३६ हजार ४५६ झाली. आजपर्यंत एकूण एक हजार २८ जणांचा मृत्यू झाला. सध्या दोन हजार ७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटिजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब संकलन पथकास ६६ व ग्रामीण भागात १३ रुग्ण आढळले. शनिवारी २८६ जणांना सुटी झाली. यात शहरातील १५६ व ग्रामीण भागातील १३० जणांचा समावेश आहे. आजपर्यंत ३३ हजार ३५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

 

ट्रकने जोरदार धडक दिल्याने जावयाचा सासऱ्याच्या घरासमोरच मृत्यू, बैलही दगावला

 

शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या)
घाटी परिसर (५), सुदर्शन नगर (२), नाथ नगर (१), उल्कानगरी (३), इंद्रप्रस्थ कॉलनी (१), अशोक नगर (१), पुंडलिक नगर (१), गजानन कॉलनी (१), न्याय नगर (२), एन सहा मथुरा नगर (१), साई परिसर (७), कासलीवाल मार्बल परिसर (१), प्रकाश नगर (४), जयभवानी नगर (२), नरेंद्र सो., (१), एन सात म्हाडा कॉलनी (४), जिवेश्वर कॉलनी (३), सिद्धेश्वर कॉलनी (१), श्री सो., एन आठ (२), एन सहा सिडको (१), एन अकरा हडको (१), सुंदरवाडी (१), भारत नगर (१), ग्रीव्हज् कॉलनी सिडको (१), सातारा परिसर (५), एन सहा कॅनॉट परिसर (१), साई नगर, चिकलठाणा (१), आंबेडकर नगर (२), चिकलठाणा (३), एन सहा सिंहगड कॉलनी (४), मूर्तिजापूर, म्हाडा कॉलनी (१), जयसिंगपुरा (१), पोलिस कॉलनी,मिल कॉर्नर (३), मीरा नगर, पडेगाव (२), श्रेय नगर (१), दर्गा रोड (२), नागेश्वरवाडी (१), बीड बायपास (३), भोईवाडा (१), एसआरपीएफ कॅम्प (१७), बेस्ट प्राईड परिसर (२), बन्सीलाल नगर (१), भावसिंगपुरा (२), इंद्रप्रस्थ, उस्मानपुरा (१), एन चार सिडको (२), एस बी कॉलनी (१), शिवाजी नगर (१), रोकडिया हनुमान कॉलनी (१), अन्य (७), टीव्ही सेंटर हडको (१), किल्लेअर्क परिसर (१), मिलिट्री हॉस्पीटल (३), हर्सुल (३), ब्रिजवाडी (१), नंदनवन कॉलनी (१), मयूर पार्क (२), समर्थ नगर (१) सूतगिरणी चौक परिसर (२), एन एक सिडको (१), जाधववाडी (१)

युनिर्व्हसल हायस्कूलविरुद्ध शिक्षण विभागाची कारवाई, पालकांनी खासदार जलील यांच्याकडे केली होती तक्रार

ग्रामीण भागातील बाधित
दौलताबाद (१), आडगाव (१), हतनूर (१), आळंद, फुलंब्री (१), रांजणगाव, गंगापूर (१), कन्नड (३), लखमपूर (१), दहेगाव (२), सूर्यवंशी नगर (१), इंद्रप्रस्थ कॉलनी (२), लक्ष्मी नगर, बजाज नगर (१), जिजामाता नगर, सिडको महानगर (१), बसवेश्वर कॉलनी, बजाज नगर (१), औराळा, कन्नड (१), गिरिजा नगर, फुलंब्री (२), सावता मंदिर, फुलंब्री (१), हरिओम नगर, फुलंब्री (१), श्रद्धा कॉलनी, वाळूज (१), शांती नगर, बकवाल नगर, नायगाव (३), कावलवाडी, सिल्लोड (६), श्रीराम कॉलनी, कन्नड (१), करमाड (४), भेंडाळा, गंगापूर (१), देवगाव रंगारी, कन्नड (१), पैठण (३), गंगापूर (१), अन्य (१), वडगाव को. (१), सिल्लोड (१), फुलंब्री (२), गणोरी फुलंब्री (१), मुलानी वडगाव, पैठण (१), औरंगाबाद (७), फुलंब्री (१), गंगापूर (१), वैजापूर (२)

आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू

औरंगाबादेत आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १ हजार २८ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. घाटीत पैठण तालुक्यातील वरोडी येथील ६० वर्षीय व ७० वर्षीय महिलेचा, खुलताबाद तालुक्यातील विरमगावातील ८५ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. तसेच पद्मपुऱ्यातील ६५ वर्षीय पुरूष, सातारा परिसरातील ५५ वर्षीय पुरूष, एन सहा सिडको, राजे संभाजी कॉलनीतील ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात एन सात सिडकोतील ७५ वर्षीय पुरूष, प्रताप नगरातील ८४ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

रुग्ण संख्या घटली तरी कोविड सेंटर राहणार सुरू, औरंगाबाद महापालिकेचा निर्णय

कोरोना मीटर
-----
बरे झालेले रुग्ण : ३३३५१
उपचार घेणारे रुग्ण : २०७७
एकुण मृत्यू : १०२८
-----------
आतापर्यंतचे बाधित : ३६४५६
--------

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Total Corona Cases Above 36 Thousand In Aurangabad District