Video : वयाच्या त्र्याहत्तरीतही प्रभाकर वाणी वाटतायत घरोघरी दूध

Aurangabad News Prabhakar Wani
Aurangabad News Prabhakar Wani

औरंगाबाद : कोरोनामुळे वयोवृद्धांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. याच दरम्यान, त्र्याहत्तर वर्षीय प्रभाकर दामू वाणी हे घरोघरी जाऊन दूध विक्री करीत आहेत. कंपनीत काम करत असतानाच अचानक तीन महिन्यांचा संप झाला. यावेळी उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने दूध व्यवसाय स्वीकारल्याचे श्री. वाणी यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

सिडको, एन-७ येथे राहणारे प्रभाकर वाणी हे ‘एपीआय’ कंपनीत कामगार म्हणून १९७२ मध्ये ९० रुपये महिना पगारावर रुजू झाले. १९८५ मध्ये अचानक कंपनीत तीन महिन्याचा संप झाला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवला.

याबद्दल ते म्हणतात, ‘‘तीन महिने खायचे काय? पोट भरायला काही पाहिजे की नको?’’ म्हणूनच, किराणा दुकान सुरू केले. ‘‘असाच एक जण येत म्हणाला, तुमच्या दुकानात दूध ठेवा! त्यांना म्हटलं, आमच्याकडे फ्रीज नाही. तर तो म्हणाला, चार-पाच पिशव्या तरी ठेवा, शिल्लक राहिलेल्या मी घेऊन जाईन.’’ असा तऱ्हेने दूध व्यवसाय सुरु झाल्याचे वाणी यांनी सांगितले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दुकानातील पिशव्या शिल्लक राहूच नयेत म्हणून ग्राहकांच्या घरापर्यंत दूध देण्याचा प्रयत्न केला. पाच दुध पिशव्यांपासून सुरु झालेला हा व्यवसाय साडेचारशे पिशव्यांपर्यंत पोचलाय. वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या पहाटे साडेतीनपासूनच यायला सुरुवात होते. दोन तास हा फेरा त्यानंतर घरोघरी रतीब. एन-७, एन-८, आयोध्यानगर भागात सकाळी सहा ते साडेआठपर्यंत देतात. याच परिसरातील शंभर घरात सुमारे दोनशे पिशव्या ते आजही घरोघरी पोचवतात. यातही त्यांना तीनदा घरी यावे लागते.

सायकल चोरीला, पायी चालण्याची वेळ

पस्तीस वर्षात श्री. वाणी यांना तीन सायकली बदलाव्या लागल्या. यातील भाजीमंडईतून आणि घराजवळून अशा दोन सायकली चोरीला गेल्या. तिसरी सायकल वापरत होते. तिचे बेअरिंग गेले आहे. मात्र, संचारबंदीमुळे दुरुस्ती होत नाही. मुलाची सायकल सध्या वापरतो. उंच असल्यामुळे त्यावरही बसता येत नाही. त्यामुळे आठवड्यापासून चालतच रतीब पूर्ण करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

दुध व्यवसायानिमित्त पहाटे लवकर उठतो. सायकलवरून फिरतो. आरोग्यही चांगले राहते. यामुळेच कधी थंडी, पावसानेही यात खंड पडला नाही.

- प्रभाकर वाणी

 दहा वर्षांपासून बाबा आमच्याकडे दुध घेऊन येतात. सेवा आणि वेळ याबाबत त्यांचा कटाक्ष असतो. भर पावसातही त्यांनी कधी कारणे सांगितली नाहीत.
- संजय महामुनी (ग्राहक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com