hospital.jpg
hospital.jpg

अन् 69 वर्षीय महिला बचावली 

औरंगाबाद : कोणत्याही टाक्‍याशिवाय, छातीची चिरफाड न करता पायातून नळीद्वारे हृदयाची प्रमुख झडप बदलण्याची शस्त्रक्रिया कमलनयन बजाज रुग्णालयातील ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजित भागवत यांच्या नेतृत्वाखाली डॉक्‍टरांच्या टीमने यशस्वी केली. अशा प्रकारची शस्त्रक्रीया मराठवाड्यात पहिल्यांदाच झाल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे. तर या शस्त्रक्रीयेमुळे एक 69 वर्षीय महिलेला जीवदान मिळाले.

या शस्त्रक्रीची माहीती देण्यासाठी डॉ. अजित भागवत व डॉ. अलोक श्रीवास्तव यांनी याविषयी बुधवारी पत्रकार परिषद आयोजीत केली होती. त्यावेळी माहीती देतांना डॉ. भागवत म्हणाले, ट्रान्सकॅथेटर एओरटिक व्हाल्व्ह इंप्लाटेशन (टावी) नावाची ही शस्त्रक्रिया आहे. वयोमानामुळे हजार रुग्णांमागे 2 ते 3 जणांमध्ये हृदयाची प्रमुख झडप अरुंद होण्याचे प्रमाण आहे. त्यामुळे हृदयाची रक्त बाहेर फेकण्याची क्षमता कमी होते.

भारतात दीड ते दोन वर्षांपूर्वी पायातून झडप बदलण्याची शस्त्रक्रिया सुरु झाली. राज्यात मुंबई, पुण्यामध्येच अशाप्रकारची शस्त्रक्रिया होतात. मात्र, मराठवाड्यात पहिल्यांदाच अशाप्रकारची शस्त्रक्रिया झाली. हि शस्त्रक्रीया 90 मिनिट चालली. यात 80 टक्के प्लॅनिंग तर 20 टक्के प्रोसीजरचा भाग असतो. दरम्यान, पायातून झडप बदलण्यात आली. छातीची चिरफाड, रक्त देणे, टाके, व्हेंटिलेटर, रक्त पातळ करण्याची औषधी या सर्व गोष्टी टाळल्या गेल्या. त्यामुळे केवळ तीन दिवसांत रुग्ण घरी जाऊ शकला.

हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुखेडकर, डॉ. रणजित पालकर, डॉ. दिनेश लहिरे, छातीविकार तज्ज्ञ व अतिदक्षता विभागप्रमुख डॉ. श्रीकांत सहस्त्रबुद्धे, डॉ. महेश केदार, डॉ. महेश चौधरी, वैभव कुलकर्णी, सागर पडघन, अश्विनी पवार, ओंकार लिंगरकर, ओंकार मेहेंदळे आदींचा ऑपरेशनच्या टिममध्ये समावेश होता.

ओपन हार्ट सर्जरीला टावीचा पर्याय
मेडट्रॉनीक कंपनीने बनवलेल्या कृत्रीम झडपेची किम्मत 21 लाख रुपये असुन सामान्य रुग्णाच्या आवाक्‍यात या शस्त्रक्रीया येण्यासाठी कृत्रीम झडपेची किंमत कमी होणे गरजेचे आहे. आता भारतीय कं पन्याही या क्षेत्रात येत आहे. त्यामुळे ओपन हार्ट सर्जरीला टावी हा एक सक्षम पर्याय ठरुन याचाच वापर भवीष्यात दिसेल असेही डॉ. भागवत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com