दुचाकीला कट मारल्यावरुन इतक्‍या टोकाला कोणी जातं का? (वाचा नेमंक काय प्रकरण)

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 January 2020

शेख शहानवाज व त्यांचा भाऊ सरफराज शेख हे दोघे सहा जानेवारी रात्री कारने घरी जात होते. पैठण रस्त्यावरील महानुभव आश्रमाजवळ संशयित सुमित पंडित व त्याचा साथीदार शेख आमेर (रा. भावसिंगपुरा) हे दुचाकीवर आले व त्यांनी शेख शहानवाज यांच्या कारसमोर दुचाकी आडवी लावली, तू आमच्या दुचाकीला कट का मारला म्हणत शेख शहानवाज यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली; तसेच त्यांच्या कारच्या काचा देखील फोडल्या.

औरंगाबाद : दुचाकीला कट का मारला, असे म्हणत रस्त्याने जाणाऱ्या कारला दुचाकी आडवी लावून कारचालकाला जबर मारहाण करून कारच्या काचा फोडल्या प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी मंगळवारी (ता.7) पहाटे अटक केली. सुमित पंडित (रा. पडेगाव) असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे. 

हेही वाचा-युवकाने स्वतःच्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र : का बरं ते वाचा 

प्रकरणात शेख शहानवाज (34, रा. रामनगर, मुदलवाडी, ता. पैठण) हे व त्यांचा भाऊ सरफराज शेख हे दोघे सहा जानेवारी रात्री कारने घरी जात होते. पैठण रस्त्यावरील महानुभव आश्रमाजवळ संशयित सुमित पंडित व त्याचा साथीदार शेख आमेर (रा. भावसिंगपुरा) हे दुचाकीवर (एमएच-20, सीएक्‍स-5774) आले व त्यांनी शेख शहानवाज यांच्या कारसमोर दुचाकी आडवी लावली, तू आमच्या दुचाकीला कट का मारला म्हणत शेख शहानवाज यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली; तसेच त्यांच्या कारच्या काचा देखील फोडल्या. आरोपी सुमितने चाकूने शहानवाज यांच्यावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे वाचलंत का?- वहिनी मला तू खूप आवडते म्हणत त्याने कवटाळले मित्राच्या पत्नीला : (वाचा कुठलं...

आरोपी सुमित पंडित (रा. पडेगाव) याला मंगळवारी (ता.सात) पहाटे पोलिसांनी अटक केली. त्याला नऊ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.जे. पाटील यांनी दिले. हल्ला करण्यामागे आरोपींचा उद्देश काय होता याचा तपास करणे आहे. आरोपीच्या साथीदाराचा शोध घेऊन त्याला अटक करणे बाकी आहे. तसेच आरेपी सुमित पंडित हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील जरिना दुर्राणी यांनी न्यायालयाकडे केली. 

क्लिक करा- मृत्युदंड विधान : काय असते डेथ वारंट? जाणून घ्या माहिती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one arrested in matter of broken glass of car