esakal | गोमांसची विक्री करु दिली नसल्याचा राग धरुन लोखंडी गज व दगडाने तिघांना जबर मारहाण

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crime News}

मुस्लीम बांधवांनी इस्लामपुरा भागातील गोमांस विक्रीच्या दुकाने इतरत्र हालवाव्या याची तक्रार पाचोड पोलिस ठाण्यासह पैठणीचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे निवेदनात व्दारे केलेली आहे.

गोमांसची विक्री करु दिली नसल्याचा राग धरुन लोखंडी गज व दगडाने तिघांना जबर मारहाण
sakal_logo
By
शेख मुनाफ

आडुळ (जि.औरंगाबाद) : आडुळ येथे मी गोमांसची विक्री करतो असे सांगितल्यानेच आम्हाला आडुळ (ता.पैठण) येथील ग्रामस्थांनी गोमांस विक्रीची दुकान लावु दिली नाही. याचा राग धरुन गोमांसाची विक्री करणाऱ्या जब्बार कुरैशी, इमरान कुरैशी, मुक्तार कुरैशी, इलियास कुरैशी (सर्व राहणार ब्राह्मणगांव, ता.पैठण) या खाटकांनी रविवारी (ता.२८) सकाळी आडुळ येथील शेख आजीज यांना जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. यानंतर याच खाटकांनी ब्राह्मणगांव येथे त्यांच्याच नात्यातील इलियास रहेमान कुरैशी व जफर रहेमान कुरैशी, वसीम हानिफ कुरैशी (सर्व रा. ब्राह्मणगांव) यांच्यावर लोखंडी गज व दगडाने मारहाण केली.

वाचा -  संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे कोणाचाही दबाव मानत नाहीत

यात इलियास हा गंभीर जखमी, तर वसीम व जफर हे जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे आडुळ येथील ग्रामस्थांनी गेल्या महिन्यापासून मटनाचे दुकान इस्लामपुरा भागात गोमांस विक्रीच्या दुकाना लावण्यास विरोध केल्यानंतर ही गुंड प्रवृत्तीच्या असलेल्या इमरान कुरैशी व त्याचे कुंटुंबिय गेल्या अनेक दिवसांपासून दडपशाहीचा वापर करुन आडुळ व ब्राह्मणगांव येथे खुलेआम गोमांसाची विक्री करीत आहेत.

वाचा -  भयानक! दहा ते 12 रानडुकरांचा एकाच वेळी जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ झालेल्या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी तरुण आले धावून

या संबंधी आडुळ येथील मुस्लीम बांधवांनी इस्लामपुरा भागातील गोमांस विक्रीच्या दुकाने इतरत्र हालवाव्या याची तक्रार पाचोड पोलिस ठाण्यासह पैठणीचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे निवेदनात व्दारे केलेली आहे. तरी दंडेलशाहीच्या जोरावर इमरान कुरैशी त्याचे कुटुंबीय आडुळ व ब्राह्मणगांव येथे रहदारीच्या रस्त्यावर उघड्यावर गोमा़ंसची विक्री करीत आहेत. इमरान कुरैशीच्या कुटुंबियावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी आडुळ व ब्राह्मणगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.

संपादन - गणेश पिटेकर