रुग्णांनाही बजावता येईल मतदानाचा हक्क, आरोग्य विभागामार्फत उपलब्ध होईल वाहन

माधव इतबारे
Saturday, 21 November 2020

आजारी असलेल्या मतदाराला दुपारी चार ते सायंकाळी पाच या वेळेत मतदानाचा हक्क बजावता येईल.

औरंगाबाद :  आजारी असलेल्या मतदाराला दुपारी चार ते सायंकाळी पाच या वेळेत मतदानाचा हक्क बजावता येईल, त्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत वाहनांची सुविधा उपलब्ध केली जाईल, असे उपजिल्हाधिकारी तथा नोडल आरोग्य अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी शुक्रवारी (ता.२०) स्पष्ट केले.

 

महापालिकेच्या मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्रात महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पदवीधर निवडणुकीसंदर्भात प्रशिक्षण घेण्‍यात आले. यावेळी श्री. शिंदे बोलत होते. प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून, त्यांनी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदाराला मास्क असणे, त्यांच्या शरीराचे तापमान तपासणे याबाबत दक्षता घ्यावी. ९८.६ पेक्षा जास्त तापमान असलेल्या मतदारांना टोकन देऊन चार ते पाच या वेळेत बोलवावे. मतदान केंद्रावर कोविड प्रतिबंधात्मक साहित्य म्हणजेच मास्क, सॅनिटायझर, थर्मल गन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुरविण्यात येणार आहे.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patients Can Excercise Their Voting Right In Graduate Election Aurangabad News