
आगीचे लोळ दिसताच नागरिकांची एकच धावाधाव झाली, तर कोणी भर रस्त्यावर थांबून नेमकं कुठे आग लागलीय हे पाहू लागला. पण जवळ जाऊन पाहतो तर कपडे जाळल्याने आगीचे मोठ-मोठे लोळ येत असल्याचे दिसताच सर्वांनी सुटेकचा निःश्वास सोडला.
औरंगाबाद : आगीचे लोळ दिसताच नागरिकांची एकच धावाधाव झाली, तर कोणी भर रस्त्यावर थांबून नेमकं कुठे आग लागलीय हे पाहू लागला. पण जवळ जाऊन पाहतो तर कपडे जाळल्याने आगीचे मोठ-मोठे लोळ येत असल्याचे दिसताच सर्वांनी सुटेकचा निःश्वास सोडला. ही घटना जालना मुख्य रस्त्यावरील सेव्हन हिल्स परिसरातील एका हॉटेलवर गुरुवारी (ता.१७) सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान घडली.
सेव्हन हिल्स परिसरात एक मोठे हॉटेल आहे. कोरोना साथीच्या काळात ते कोरोना रुग्णांची संबंधित हॉटेलात व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय संबंधित परिसरात वर्दळ असते. सायंकाळी संबंधित परिसर जास्त गजबजतो. दरम्यान नागरिकांची ये-जा असतानाच हॉटेलच्या टेरेसवर नागरिकांना आगीचे लोळ दिसू लागले. दरम्यान सेव्हन हिल्स उड्डाणपुलावरुन जाणारे मुख्य रस्त्यावर थांबूनच काय प्रकार आहे हे पाहू लागले, तर हॉटेलच्या आजूबाजूच्या लोकांनी आगीकडे धाव घेतली. परंतू आगीचे लोळ टेरेसवरुन येत असताना मात्र खाली सर्व काही अलबेल असल्याचे दिसून आले. त्यानंतर टेरेसवर कपडे जाळण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला.