प्लाझ्मा थेरपी ! अपेक्षित यशापासून अजूनही कोसोदुरच ! 

plasma therpi 05.jpg
plasma therpi 05.jpg

औरंगाबाद : कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचे ठोस सकारात्मक परिणाम अद्याप दिसुन येताना दिसत नाहीत. मान्यता मिळालेल्या विविध संस्थामध्ये क्लिनिकल ट्रायलची प्रक्रीया असो की, प्लाझ्मा रुग्णांना देण्याची प्रक्रीया यातून मृत्यूदरातही घट दिसुन येत असल्याचे अजुन तरी निष्पन्न झाले नाही. आशेचा किरण वाटत असलेल्या या थेरपीबाबत संशोधनही पुर्णत्वाकडे गेले नसल्याने तुर्तात तरी कोरोना रुग्णांना पाहण्याशिवाय पर्याय नसल्याची प्राथमिक बाब सद्यस्थितीत दिसते. 

काही तज्ज्ञांच्या मते कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दिल्यानंतर त्यातुन मृत्यूदरात काही घट दिसुन आली नाही. प्लाझ्मा थेरपी कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या कमी करण्यात सहाय्यक ठरत आहेच, असे संशोधनाच्या आधारावरुन सांगता येत नाही. घाटी रुग्णालयात रांजणगाव शेणपुंजी येथील ज्या रुग्णावर प्लाझ्मा थेरपी सुरु करण्यात आली. तो रुग्ण व्हेंटीलेटरवर होता. त्याच्यावर प्लाझ्मा थेरपीची पहिली प्रक्रीया पुर्ण झाली होती. परंतु तिसऱ्याच दिवशी तो रुग्ण दगावला. मात्र हा प्राथमिक टप्पा होता. याबाबत घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी सांगितले की, आता आपल्याकडे प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढली असुन प्लाझ्माही मोठ्या प्रमाणात संकलित झाला आहे. आता अटी व शर्थीनुसार योग्य रुग्णांचा शोध घेऊन सर्व प्रक्रीया पार पाडण्यात येईल. 

आतापर्यंतची प्रक्रीया 

  • - प्लाझ्मा दानासाठी घाटी रुग्णालयात समिती गठीत. 
  • - समितीमार्फत चळवळ उभारुन दात्यांना प्लाझ्मा देण्याचे आवाहन. 
  • - प्लाझ्मासाठी कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांचा शोध. 
  • - प्लाझ्माचे केले संकलन. पहिल्या टप्प्यात रुग्णाला प्लाझ्माही दिला गेला. 
  • - रुग्ण दगावल्यानंतर दुसऱ्या रुग्णाचा शोध सुरु. 
  • - एमजीएम रुग्णालयालाही प्लाझ्मा थेरपीला मान्यता 
  • - प्लाझ्मा संकलित करणे, आवश्‍यकतेनुसार रुग्णाला वापरणे ही प्रक्रीया सुरु. 

प्लाझ्मा डोनर चांगले समोर येत आहेत. आपल्याकडे प्लाझ्मा कलेक्शनही चांगले झाले आहे. आता योग्य रुग्ण सापडला की त्याला प्लाझ्मा देणार आहोत. संशोधनाची सर्व तयारी आहे. योग्य रुग्ण हवा आहे, काही अटी व शर्थीही असतात, त्याप्रमाणे आमचा शोध सुरु असुन संशोधनानंतर निष्कर्ष काढता येईल. - डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकिय महाविद्याल व रुग्णालय (घाटी), औरंगाबाद. 

प्लाझ्मा थेरपीची मान्यता मिळाली, डोनरला प्रोत्साहित करीत आहोत. प्लाझ्मा संकलित करणे, गरज वाटली तर रुग्णाला वापरणे ही प्रक्रीया सुरु झाली आहे. काही निष्पन्न होण्याइतपत कार्य अजुन झालेले नाही. पण स्पेसिफिक अभ्यास केला जाईल. 
-डॉ. राजेंद्र बोहरा, अधिष्ठाता, एमजीएम. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com