Breaking : उपोषणाला बसणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Maratha Kranti Morcha
Maratha Kranti Morcha

औरंगाबाद : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी रविवारी (ता.२०) उपोषणासाठी बसणार होते. मात्र उपोषणाला बसण्यापूर्वी पोलिसांनी या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. हे आंदोलन विनापरवानगी करण्यात येत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे समन्वयक व कार्यकर्ते उपोषणास बसणार होते. मात्र पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, पोलिस भरतीला स्थगिती मिळालीच पाहिजे अशा घोषणा या समन्वयकांनी दिल्या. पोलिसांनी दडपशाही करून आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे.


या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरते स्थगित केले. या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. मराठा समाजाच्या उमेदवारांना नोकरीच्या राखीव जागापासून लागत आहे. मराठा समाजाची आर्थिक सामाजिक परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे.

हे राज्य मागास आयोगाच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे, असे असताना मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने काढून घेण्यात आले. आरक्षणाला मिळालेली स्थगिती तात्काळ उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करावा या त्यासाठी मराठासमाजाने आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. या आंदोलनात समन्वयक पंढरीनाथ गोडसे, भरत कदम, किरण काळे पाटील, मनोज पाटील मुरदारे, उदयराज गायकवाड, संतोष धांडे पाटील, राजेंद्र हारणे, पुंडलीक कोलते यांना अटक करण्यात आली.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com