'बामु' चा परीक्षा विभाग काठावर पास ! 

univer.jpg
univer.jpg

औरंगाबाद : पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना अखेर ऑनलाईन परीक्षेसाठी उपयुक्त सराव प्रश्नसंच उपलब्ध होण्यास सुरवात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बुधवारी (ता. ३०) पहिल्या दोन पेपरसाठी प्रश्‍नसंच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकला आहे. 

उन्हाळी २०२० ची परीक्षा एक ऑक्टोबरपासून सुरु होणार होती. मात्र, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या लेखणी बंद आंदोलनामुळे परीक्षा पुढे जात असल्याचे मंगळवारीच (ता. २९) विद्यापीठाने जाहीर केले आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी औरंगाबादेत झालेल्या पत्रकार परिषदेत आणि विद्यापीठानेही २५ सप्टेंबरलाच परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना प्रश्‍नसंच देणार असल्याचे सांगितले होते. परीक्षा सुरळीत होण्यासाठी ऑनलाईन सराव परीक्षा होणार होती. 

विद्यापीठाने सराव परीक्षेसाठी https://bamu.unionline.in/ या संकेतस्थळावर प्रश्‍नसंच उपलब्ध करुन दिले आहे. परिपत्रक निघाल्यानंतर तब्बल सहा दिवसानंतर परीक्षा विभागाला जाग आली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा घेणारे विद्यापीठच काठावर पास झाल्याची प्रतिक्रिया पालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. 


ऑनलाईन पद्धतीचा विकल्प निवडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास सराव परीक्षेत भाग घेणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास त्या विद्यार्थ्याला ऑनलाईन परीक्षेत सहभाग घेता येणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी ओएमआर शीट विकल्प दिला आहे परंतु मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा द्यायची असेल तेही या प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहेत. विद्याशाखानिहाय टेलिग्रामच्या लिंक देण्यात आल्या आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com