esakal | दानवेंच्या विरोधात पाण्याच्या टाकीवर आंदोलन सुरुच
sakal

बोलून बातमी शोधा

prahar against raosaheb danve

गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास या आंदोलनास सुरवात झाली होती. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांच्या वादग्रस्त विधानाचे निषेध करण्यात आला होता. 

दानवेंच्या विरोधात पाण्याच्या टाकीवर आंदोलन सुरुच

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या विरोधात सुरु असलेले आंदोलन शुक्रवारीही सुरुच आहे. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मंत्री दानवे जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे. नेमकं प्रकरण असं की, औरंगाबाद येथील शिवाजीनगर भागातील पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या विरोधात शेतकरी आंदोलनाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल गुरूवारपासून (ता.दहा) आंदोलन सुरु केले आहे.

फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथील एका कार्यक्रमात बोलताना दानवे म्हणाले होते की, कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात प्रहारतर्फे पाण्याच्या टाकीवर आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनात सुधाकर शिंदे, बाळू भोसले, अमोल ढगे, दीपक चिकटे, राम गाडेकर, मंगेश साबळे, सुदाम गायकवाड यांच्यासह 30 कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

ई-सुविधा प्रणालीत वैयक्तिक माहिती भरण्यास विद्यापीठाची स्थगिती

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक याबद्दल म्हणाले की, शेतकरी आंदोलनामागे खलिस्तानवादी आणि चीन आहेत, असा आरोप करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. दानवे हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचे वक्तव्य ही सरकारची भूमिका आहे की वैयक्तिक भूमिका आहे, हे सरकारने स्पष्ट करावे.

औशातील सहा युवकांनी उभी केलेली 'माणुसकीची भिंत' देतेय गरजूंना आधार

केंद्रीय मंत्री दानवे माफी मागत नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. साधारण दुपारी साडेबाराच्या आसपास या आंदोलनास सुरवात झाली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांच्या वादग्रस्त विधानाचे निषेध करण्यात आले आहे. तत्पूर्वी संघटनेचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दानवेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना माध्यमांना म्हणाले, की आता दानवेंचा डीएनए चेक करावा लागेल. तो नेमका अमेरिकेतला, चीन किंवा पाकिस्तानचा आहे. आम्ही भारत सरकारला त्यांच्या डीएनए चेक करण्याची विनंती करणार आहे.

(edited by- pramod sarawale)