आंदोलनांचा पर्यटनावर परिणाम : पैठणचे व्यावसायिक वैतागले

चंद्रकांत तारू 
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

नागरिकत्व कायद्यामुळे अनेक भागांत दगडफेक, हिंसाचार उफाळला. प्रशासनाने काही ठिकाणी संचारबंदी लावली. त्यामुळे खासगी व शैक्षणिक सहलीवर त्याचा परिणाम होऊन या सहली पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

पैठण (जि. औरंगाबाद) : केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा जारी केल्यामुळे देशभरातून या कायद्याला विरोध होत आहे. यामुळे राज्यभर हिंसाचार उसळून विविध जिल्ह्यांत तणावाचे वातावरण पसरले आहे. या तणावाच्या परिस्थितीचा फटका पैठण येथे पर्यटनासाठी येणाऱ्या सहलींना बसला आहे.

सहलींच्या माध्यमातून बाजारपेठेत होणारी आर्थिक उलाढाल सहलीच्या हिवाळी मोसमात गारठली आहे; तसेच या बाबींचा परिणाम शैक्षणिक सहलीवर झाला असून, सहलीच्या गर्दीमुळे सकाळी व संध्याकाळी शहरातील फुलून जाणारे वातावरण कोमेजून गेल्याचे चित्र दिसत आहे.

नागरिकत्व कायद्यामुळे अनेक भागांत दगडफेक, हिंसाचार उफाळला. प्रशासनाने काही ठिकाणी संचारबंदी लावली. त्यामुळे खासगी व शैक्षणिक सहलीवर त्याचा परिणाम होऊन या सहली पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

काय सांगता - युरोपची कंपनी करतेय थेट बांधावरून कारले खरेदी

मागील आठवड्यात संपूर्ण राज्यात जमावबंदी आदेश कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी लावण्यात आला. या काळात विविध संघटना व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यामुळे शालेय सहली व खासगी देवदर्शनासाठी येणारे भाविक व पर्यटकांच्या सहलीचे पैठण शहरात येण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे.

हेही वाचा -  सहा महिन्याचं बाळ आईच्या कुशीत होतं.....पण काळही आला अन् वेळही आली...

वर्षातील डिसेंबर हा महिनाच सहलीचा वर्दळीचा काळ असून, या काळात पैठण शहरात मिळालेल्या माहितीनुसार जवळपास खासगी व शैक्षणिक सहली येण्याचे प्रमाण एक हजारापेक्षा अधिक असते; परंतु यंदा मात्र हे प्रमाण घटले आहे.

सहलीसाठी खास निवडले जाते पैठण

शालेय सहली असो वा खासगी देवदर्शनाच्या सहलीसाठी पैठण या ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन असलेल्या पैठण शहराची निवड केली जाते. त्यामुळे येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात सहली येतात. सहलीतील पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे आशिया खंडातील सर्वांत मोठे मातीचे जायकवाडी धरण, महाराष्ट्राच्या सौभाग्याचं लेणं पैठणी साडी व संत एकनाथ महाराज समाधी मंदिर होय; परंतु अचानक नागरिकत्व कायद्याचे राज्यभर उमटलेल्या पडसादामुळे सहलीअभावी उदासीनता पसरली आहे.

हृदयद्रावक - आंधळ्या प्रेमाचा असा शेवट : वाचा करुण कहाणी 

नागरिकत्व कायद्याविरोधात निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे सहलींचा खोळंबा झाला आहे. खासगी व शैक्षणिक सहली पैठण शहरात तुरळक येत आहेत. त्यामुळे एकूण सर्वच बाजारपेठेवर परिणाम होऊन व्यापारी, छोटे-मोठे दुकानदारांना हा आर्थिक फटका बसला आहे. 
- पवन लोहिया, कापड व्यापारी, पैठण.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protest March Against NRC Affecting on Tourism Paithan News Aurangabad News