माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंना घेराव

Protestors Ghero MLA Haribhau Bagde
Protestors Ghero MLA Haribhau Bagde

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्हा बॅंकेची पीरबावडा येथील शाखा गावापासून दोन किलोमीटर दूर अंतरावर हलवल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थ व खातेदारांचे मंगळवारपासून (ता.21) उपोषण करण्यात येत आहे. बॅंकेच्या बैठकीतून परताना माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांना बुधवारी(ता.22) दुपारी तीनच्या सुमारास उपोषणकर्त्या महिलांनी घेराव घातला. उपोषणकर्त्यांचा रोष पाहुन बागडे यांना वाहन न बसता चालत जात स्वत:ची सुटका करावी लागली. 


जिल्हा बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित राहून दुपारी बाहेर पडले असताना बागडे यांचे वाहन बॅंकेच्या एका प्रवेशद्वारासमोरच अडवण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या प्रवेशद्वारातून बाहेर पडत असताना खातेदारांनी तेथेही ठाण मांडत त्यांना रोखले. महिला खातेदारांनी आक्रमकपणे बाजूही मांडण्याचा प्रयत्न केला. अखेर बागडे यांना पायी उतरूनच बाहेर पडावे लागले. रस्ता ओलांडूनही त्यांना जावे लागले. या दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या बंदोबस्तात महिला पोलीस नसल्यामुळे महिला आंदोलकांना थांबवता आले नाही. त्यामुळे बागडे यांना पायी चालत जावून आंदोलकांपासून सुटका करून घ्यावी लागली. 

 पुढाऱ्याशी  हितसंबंध जपण्यासाठी हलवली शाखा

औरंगाबाद जिल्हा बॅंकेची सर्वसाधारण सभा बुधवारी(ता.22) अध्यक्ष नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या सभेच्या पार्श्वभूमीवर फुलंब्री तालुक्‍यातील पीरबागडा येथील खातेदारांनी जिल्हा बॅंकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गावातील बॅंकेची शाखा एका राजकीय पुढाऱ्याशी असलेले व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी दोन किलोमीटर अंतरावर हलवण्यात आली असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांतर्फे केला जात आहे.

सुमारे साडेसात हजार खातेदारांची कुचंबणा

वयोवृद्ध खातेदारांना एवढे मोठे अंतर चालत जावून गाठणे अशक्‍य असून अन्य वाहनाचीही व्यवस्था फारसी नाही. खासगी वाहनातून बॅंकेत जाण्यासाठी अधिक पैशांची पदरमोड करावी लागते असल्याचेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सुमारे साडेसात हजार खातेदारांची कुचंबणा होत असून स्थलांतरीत केलेली बॅंकेची शाखा पुन्हा पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू असतानाच बागडे हे थेट वाहनातून परतण्याच्या तयारीत असताना त्यांचे वाहन अडवून घेराव घालण्यात आला. या आंदोलकांची जिल्हा परिषदेचे सभापती किशोर बलांडे यांनीही भेट घेऊन भूमिका समजून घेतली. 
जाणून घ्या -निवृत्त शिक्षिकेचे मंगळसूत्र धूम स्टाईलने हिसकावले​

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com