Video : पत्रकारांना बातम्या देणाऱ्या गद्दारांना हाकलणार - राज ठाकरे

अतुल पाटील
Saturday, 15 February 2020

महापालिका निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलाच जोर धरला आहे. मात्र, त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या कुरबुरीच्या बातम्या वृत्तपत्रांत छापून आल्या. यावर राज ठाकरे बातम्या फोडणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. 

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलाच जोर धरला आहे. मात्र, त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या कुरबुरीच्या बातम्या वृत्तपत्रांत छापून आल्या. यावर राज ठाकरे बातम्या फोडणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. 

पक्षाच्या संदर्भातील अत्यंत वाईट आणि चुकीच्या बातम्या आपले काही पदाधिकारी वर्तमानपत्रांना आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना पुरवताहेत. हे असले गद्दार मला अजिबात पक्षात नको आहेत, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी मार्गदर्शन मेळाव्यात सांगितले.

शंकररावांना का नव्हते मुंबईत घर...

गुलमंडीतील महावीर भवनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, की मी काहीजणांना सांगणार आहे. त्याप्रमाणे मला ती लोक सभागृहात नको आहेत. ती नावे मी आयोजकांना देणार आहे. उद्या जर वेळ पडली तर, मी पक्षामध्येही ठेवणार नाही. आणि ह्याचे कारण म्हणजे, मला ज्या बातम्या मिळाल्या आहेत. काही दिवसातल्या विशेषतः दोन दिवसातल्या त्यातल्या पक्षाच्या संदर्भातील अत्यंत वाईट आणि काही चुकीच्या बातम्या आपले काही पदाधिकारी वर्तमानपत्रांना आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना पुरवताहेत, त्यांची नावेदेखील मला कळली आहेत.

अशोक चव्हाण म्हणाले, मेरे सपनों की रानी

येत्या दोन दिवसात मी निर्णय घेईन कि, त्यांना पक्षात ठेवायचे आहे किंवा नाही. हे असले गद्दार मला अजिबात पक्षात नको आहेत. मला या लोकांची गरज नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसात पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेईल, असेही ते म्हणाले. 

पत्रकार बांधवांनादेखील विनंती आहे, की हा आमचा पक्षांतर्गत विषय असल्यामुळे याच्यानंतरच्या बैठकीला आपण नाही थांबला तर, आनंद होईल. पुढच्यावेळी मी जेव्हा येईन, त्यावेळी आपल्याशी गप्पा नक्की मारीन, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray In Aurangabad Maharashtra News