सरकार कोरोनाचा बाऊ करतोय : राज ठाकरे 

अनिल जमधडे
Wednesday, 11 March 2020

औरंगाबाद : कोरोनाच्या रुग्णांची संख्या सध्यातरी चिंताजनक नाही, अद्याप कुणी दगावला असल्याची माहिती नाही तरीही प्रशासनाकडून विनाकारण बाऊ केला जात आहे. कोरोनापेक्षा इतर आजारांमुळे दगावणाऱ्यांची संख्या आपल्याकडे जास्त आहे. देशात दर महिन्याला चारशेहून अधिक रूग्ण दगावतात, वर्षाला हे प्रमाण दीड लाख एवढे आहे. मग कोरोनाची भिती का दाखवली जातेय? काळजी नक्कीच घ्यायला पाहिजे, पण लोकांना विनाकारण घाबरवू नये, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. आता कोरोनाच्या भीतीने तेवीस दिवसांवर आलेल्या महापालिका निवडणुका तुम्ही पुढे ढकलणार आहात का? असा सवाल त्यांनी केला. 

राज ठाकरे औरंगाबादेत आले, पण कोरोनाने केला मुड आँफ

शिवजयंती साजरी करण्यासाठी राज ठाकरे बुधवारी (ता. ११) दुपारी शहरात दाखल झाले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोरोनाची लोकांना भिती दाखवली जात असल्याचा आरोप केला. राज ठाकरे म्हणाले, की मनसेची शिवजयंती आणि मिरवणूक होणारच. पण कोरोनाच्या नावाखाली लोकांना विनाकारण घाबरवले जात आहे. या रोगाची व्याप्ती किती आहे, खरेच पॅनिक होण्यासारखे रूग्ण आपल्याकडे आढळलेत का? मिरवणूकीला परवनागी नाकारणाऱ्या पोलीसांना तरी याबद्दल किती माहिती आहे. 

शिवशाहीने मोडले एसटीचे कंबरडे 

आताच मला नाशिकमध्ये १४४ कलम लागू केल्याची माहिती मिळाली, कशासाठी हे सगंळ सुरू आहे. या रोगाची लागण व्हावी असे अजिबात कुणाला वाटत नाही, पण विनाकारण लोकांमध्ये भिती का पसरवली जात आहे? औरंगाबादेत पोलीस मिरवणूकीला परवानगी नाकारत आहे, मग तुम्ही महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलणार आहात का? मागणी होत असली तरी आज तसा निर्णय घेणार आहात का? एका जिल्ह्यात एक आणि दुसरीकडे दुसरा निर्णय असे कसे चालेल? परदेशातून येणाऱ्या बातम्यावरून आपण लोकांना घाबरवतोय, त्यांच्याकडे रोगांचे प्रमाण कमी असते. काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, घाबरण्याची गरज नाही. आमची शिवजयंती साजरी होणारच, असेही राज यांनी यावेळी ठासून सांगितले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thakrey News Aurangabad