esakal | रमाजान : मुस्लिम बांधवांसाठी पोलिस, महापालिकेने घेतला हा निर्णय...
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad City news

इफ्तारसाठी शहरात फळांना मोठी मागणी असते. या पार्श्‍वभूमीवर शहरात २१ ठिकाणी फळ मार्केट सुरू करण्याचा निर्णय पोलिस प्रशासन व महापालिकेने घेतला आहे. तसेच ४० ठिकाणी सकाळी ११ वाजेपर्यंतच भाजी मार्केट सुरूच राहणार आहेत. 

रमाजान : मुस्लिम बांधवांसाठी पोलिस, महापालिकेने घेतला हा निर्णय...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवातर्फे दिवसभर रोजा ठेवल्यानंतर सायंकाळी फलाहाराने रोज इफ्तार केला जातो. त्यामुळे शहरात फळांना मोठी मागणी असते. या पार्श्‍वभूमीवर शहरात २१ ठिकाणी फळ मार्केट सुरू करण्याचा निर्णय पोलिस प्रशासन व महापालिकेने घेतला आहे. तसेच ४० ठिकाणी सकाळी ११ वाजेपर्यंतच भाजी मार्केट सुरूच राहणार आहेत. 

कोरोनामुळे शहरात लॉकडाउन सुरू करण्यात आले आहे. त्यात पवित्र रमजान महिना सुरू होत असल्याने मुस्लिम समाजबांधवांची गैरसोय होणार नाही, याची काळजी महापालिका व पोलिस प्रशासनाने घेतली आहे. मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीसाठी अर्थातच रोजा सोडण्यासाठी फळे, इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी २१ ठिकाणी खुल्या जागांवर हे मार्केट सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पोलिस आयुक्‍त चिरंजीव प्रसाद, महापालिका आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी चर्चेतून शहराच्या विविध भागांतून ही ठिकाणे अंतिम केली असून, दुपारी तीन ते सायंकाळी साडेपाचपर्यंत फळे विक्री होईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. 

या ठिकाणी फळ मार्केट 
 आमखास मैदान 
 सूतगिरणी मैदान, रोशन गेट 
 महापालिका मैदान, अल्तमश कॉलनी 
 हर्सूल कारागृह मैदान 
 मोतीवाला स्कूल मैदान 
 न्यू एसटी कॉलनी मैदान 
 शहागंज बसस्थानक मैदान 
 दिल्ली गेट मैदान, पेट्रोलपंपासमोर 
 रोजाबाग, ईदगाह मैदान 
 पैठण गेट सर्कल, खोकडपुरा 
 छोटा तकिया मैदान, नूतन कॉलनी 
 सिल्क मिल कॉलनी मैदान 
 नारेगाव महापालिका शाळा मैदान 
 जाधववाडी मंडई परिसर 
 चिकलठाणा आठवडे बाजार 
 महापालिका मैदान, शास्त्रीनगर 
 शहानूरवाडी दर्गाह मैदान 
 छावणी आठवडे बाजार 
 पाणचक्की महापालिका मैदान 
 विनर स्कूल मैदान, मकसूद कॉलनी 


दिव्यांग महिलेला शिवसेनेचा आधार 
औरंगाबाद : दिव्यांगांच्या मदतीसाठी शिवसेना धावली असून, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून नारेगाव भागातील परवीन शेख गुलाब यांच्या घरी जाऊन जीवनावश्‍यक वस्तू देण्यात आल्या. शहरातील विविध भागांतील दिव्यांगांना मदतीसाठी नगरसेवक सचिन खैरे, युवासेना उपजिल्हाधिकारी नारायण सुरे, शहर सचिव समाधान पाटील, विभाग अधिकारी रविराज क्षीरसागर पुढाकार घेत आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा