सदाभाऊ खोतांना सत्तेतून पायउतार झाल्यावर लागलेत शेतकरी हिताचे होडाळे, म्हणे नविन पक्ष काढणार 

Sadabhau Khot News Aurangabad
Sadabhau Khot News Aurangabad

औरंगाबाद : एकेकाळी शेतकऱ्यांचे प्रश्‍न हिरिरीने मांडणारे सदाभाऊ खोत यांनी भाजपशी जवळीकता साधत युती सरकारमध्ये कृषी व पणन मंत्रिपद सांभाळले. आता तरी प्रश्‍न सुटतील अशी आशा लागलेल्या शेतकऱ्यांचा मात्र हिरमोड झाला; परंतु सध्या सत्तेत नसलेल्या खोत यांना शेतकरी हिताचे डोहाळे लागल्याचे चित्र आहे. आपण नवीन पक्षाची स्थापना करणार असून "आता शेतकऱ्यांसाठी लढायचंय' असे ते शनिवारी (ता. 18) औरंगाबादेत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. 

खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचा कार्यकर्ता निर्धार मेळावा शनिवारी (ता. 18) शहरात पार पडला. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""जनतेला न्याय देणारा पक्ष हवा आहे आणि अशाच पक्षाची आपण स्थापना करणार आहोत. हा पक्ष मध्यमवर्गीयांना बरोबर घेऊन जाणारा असेल. या सर्व कारणांमुळे नवा पक्ष स्थापनेचा निर्णय आम्ही घेतला आहे. याचे पहिले अधिवेशन एप्रिलमध्ये मुंबईत होईल. सर्व घटकांचे प्रश्न घेऊन हा नवा पक्ष काम करेल. या नव्या पक्षाचा झेंडा काय असेल, नाव काय हवे, हे सर्व जनतेतून आले पाहिजे त्यासाठी विविध माध्यमातून जनतेला आवाहन करीत आहोत. तुम्ही नाव सुचवा. पंधरा दिवसांत जी नावं येतील ती नावं समोर घेऊन विद्वानांना घेऊन एक नाव ठरवून ते पक्षाला देण्यात येईल.'' मेळाव्याला सीमा वाघ, पूजा झोल, प्रदेश उपाध्यक्ष शिवनाथ जाधव, युवा प्रदेश अध्यक्ष पांडुरंग शिंदे, कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रवक्ते जितू अडेलकर, दीपक पगार, सागर खोत आदींची उपस्थिती होती. 

कर्जमाफी म्हणजे फसवणूक 
महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीविषयी खोत यांना विचारले असता ते म्हणाले, ""राज्य सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या केलेली फसवणूक आहे. फडणवीस सरकारनेही कर्जमाफीची घोषणा केली होती; पण भाजपच्या काळातही ती पूर्ण होऊ शकली नाही. शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिला. विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इतर पक्षांनी सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती; मात्र अजूनही सरसकट कर्जमाफी झालेली नाही.'' सीएए विषयावर बोलताना "नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्यांनी चीनमध्ये जाऊन पाहावे मग टीका करावी,' असे म्हणाले. 

वभोजनाची वाट पाहतोय 
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या शिवभोजनाची राज्यातील बारा कोटी जनता वाट पाहत आहे. प्रत्येक गावात हे भोजन सुरू व्हावे. यातून तरुणांनाही रोजगार मिळेल. जर त्यांच्या या भोजनामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या तर चांगलीच गोष्ट आहे. आम्ही वाट पाहत आहोत. यासाठी आम्ही सरकारला मार्चअखेरपर्यंतची डेडलाइन दिल्याचेही खोत म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com