सुभाष देसाई म्हणाले, आता शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

शेतकरी चिंतामुक्त करण्यासोबतच सर्वसामान्य जनतेसाठी गुणवत्तापूर्ण सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण सर्व एकत्रित प्रयत्नांतून कृतीशील होत जिल्ह्याचा लौकीक वाढवू या, असे आवाहन पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग व खनिकर्म, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी रविवारी (ता. 26) येथे केले.

औरंगाबाद : शेतकरी चिंतामुक्त करण्यासोबतच सर्वसामान्य जनतेसाठी गुणवत्तापूर्ण सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण सर्व एकत्रित प्रयत्नांतून कृतीशील होत जिल्ह्याचा लौकीक वाढवू या, असे आवाहन पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग व खनिकर्म, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी रविवारी (ता. 26) येथे केले.

पोलीस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले, यावेळी श्री. देसाई बोलत होते. ते म्हणाले, शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी कल्याणकारी योजना राबवण्यास या शासनाचे प्राधान्य आहे. त्यांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलली जात असून महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हे त्याचे उदाहरण आहे. या योजनेतंर्गत दोन लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार असून त्यासाठी शेतक-याचे कोणत्याही प्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात घेतले जाणार नाही. त्यामुळे अल्पभूधारकांना ही या योजनेचा लाभ होणार आहे. 

Image may contain: 3 people, people smiling, outdoor

हेही वाचा - एका क्‍लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी     

गोरगरीब, गरजू जनतेला माफक दरात जेवण उपलब्ध करुन देण्यासाठी या शासनाने आज पासून राज्यभरात 'शिवभोजन' ही महत्वकांक्षी योजना सुरु केली आहे.यामध्ये दहा रुपये एवढ्या नाममात्र शुल्कात जेवण मिळणार आहे,असे सांगूण पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात उद्योग उभारणीला भर देण्यात येत आहे.त्याच उद्देशाने मा.मुख्यमंत्री यांनी नुकतीच येथे पाचशे एकर क्षेत्रावर अन्न प्रक्रिया केंद्र उभारणार असल्याचे जाहीर  केले आहे.लवकरात लवकर त्याचे काम सुरु होणार असून त्याठिकाणी शंभर एकर जागा ही महिला उद्योजिकांसाठी राखीव असल्याचे पालकमंत्री म्हणाले. 

हेही वाचा - याच्यावर आहे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे औरंगाबादेतून चोरले होते सत्तर तोळे सोने 

जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, रोजगार यासह इतर मूलभूत सोयी सुविधांच्या उपलब्धेतेसाठी अग्रक्रमाने काम करण्यात येणार असून, आरोग्य सेवा या विशेषत्वाने अधिक दर्जेदार करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने कालच घाटी या शासकीय रुग्णालयाची पाहणी करण्यात आली आहे. त्याठिकाणी ज्या समस्या आहेत, त्या तातडीने दुर करुन तिथे अधिक व्यापक आणि गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा सहजतेने उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने विकास आराखडा तयार करुन शासनाकडे त्याच्या पूर्ततेसाठी पाठपुरावार करणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. 

Image may contain: one or more people and outdoor

पर्यटन नकाशावर जिल्ह्याचे नाव उंचावणार

औरंगाबाद हा पर्यटन जिल्हा असून आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर त्यांचे स्थान उंचावण्याच्या दृष्टीने लवकरच राज्याच्या पर्यटन मंत्र्यांसोबत जिल्यातील महत्वाच्या पर्यटन स्थळांची पाहणी करुन त्यांच्या विकासासाठीचा आराखडा तयार करुन विकास कामे केले जातील. जेणेकरुन येथील पर्यटनाला चालना मिळून रोजगाच्या संधी विस्तारण्यासाठी त्याचा लाभ होईल,असे सांगूण पालकमंत्री यांनी यावेळी जिल्ह्यात माता बाल संगोपन कार्यक्रम, बालरक्षक मोहीम, जलयुक्त, मागेल त्याला शेततळे, सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन यासह इतर अनेक योजनांमध्ये जिल्हा उत्कृष्ट कामगिरी करत आहे याबाबत समाधान व्यक्त केले. 

राष्ट्रीय पदक विजेत्यांचा सत्कार

उत्कृष्ट कामगिरी केलेले तसेच राष्ट्रीय पदक विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात राष्ट्रपती सेवा पदक व प्रशस्तीपत्रक प्राप्त विजेते - निशिकांत हनुमंत भुजबळ (सहायक पोलीस आयुक्त, सिडको विभाग, औरंगाबाद शहर), पोलीस निरिक्षक सुभाष बाबासाहेब भुजंग, गौतम केशव पातारे (पोलीस निरीक्षक, दहशतवाद विरोध पथक औरंगाबाद युनिट), प्रमोद दादु गायकवाड (सुभेदार, मध्यवर्ती कारागृह औरंगाबाद), अविनाश लक्ष्मीनारायण आघाव (पोलीस निरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, औरंगाबाद युनिट), श्रद्धा अशोक वायदंडे (सहायक पोलीस निरीक्षक, औरंगाबाद शहर), डॉ. राहुल हरीभाऊ खटावकर (सहायक पोलीस निरीक्षक, औरंगाबाद शहर) यांचा समावेश होता. 

राज्यस्तरीय पारितोषिक (पोलीस विभाग) विशेष सेवा पदक

नक्षलग्रस्त भागात गडचिरोली येथे केलेल्या गुणवत्तापुर्ण सेवा बजावल्याबद्दल संदिप रघुनाथ गावित, पोलीस उपअधीक्षक (उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गंगापुर) प्रदिप रमेश भिवसने, पोलीस उपनिरिक्षक, (कनेक्शन सेल औरंगाबाद ग्रामीण), भगवान आबासाहेब झरेकर, पोलीस स्टेशन खुलताबाद, विलास सुपडूसिंग घुसिंगे, पोलीस स्टेशन पैठण, लक्ष्मण कनलाल किर्तने, पोलीस स्टेशन बिडकीन, राज्य  राखीव पोलीस बल यामध्ये राजेंद्र अंबादास राऊत, पोलीस निरीक्षक, दिपक हिम्मतराव गायकवाड, सशस्त्र पोलीस शिपाई, अशोक पांडुरंग कर्डिले, सशस्त्र पोलीस शिपाई, प्रविण आनंद सपकाळ, नागे उत्तम शिंदे, संदीप साहबराव काटकवार, गजानन अशोक मेटकरी, लक्ष्मण  माणिक पवार (मयत -तर्फे आई वडील)यांना सन्मानित करण्यात आले.  
(क्रिडा विभाग) 2018-19 यामध्ये पुढील खेळाडुंना सन्मानित करण्यात आले

हेही वाचा - चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं

क्रिडा संघटक (स्क्वॉश) प्रदीप रविंद्र खांडे, क्रिडा मार्गदर्शक (वुशू) महेश कृष्णा इंदापुरे, श्रीमती कशिश दिपक भराड, (महिला खेळाडु) (तलवारबाजी), श्रीमती श्रद्धा कडुबाळ चोपडे, (महिला खेळाडु) (जुडो), गौरव अविनाश जोगदंड, (पुरूष खेळाडु) (जिमनॅस्टीक), विनय मुकूंद साबळे, (पुरूष खेळाडु) (व्हिलचेअर तलवार बाजी) यांनाही सन्मानित करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Republic Day Aurangabad Flag Hosting By Subhash Desai Aurangabad News