चिकलठाणा एमआयडीसीत रस्त्यांची कामे सुरू

Road Works Started In Chikalthana MIDC Aurangabad News
Road Works Started In Chikalthana MIDC Aurangabad News

औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांची कामे करण्याची मागणी उद्योग संघटनांतर्फे सातत्याने करण्यात येत होती. आता ब्रिजवाडी ते एपी बॉयलरपर्यंत, ब्रिजवाडी ते प्रतीक इंजिनिअरपर्यंत सव्वा किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी चिकलठाण्यातील रस्त्यांची दखल घेत, याविषयी काम करण्याचे आश्वासन उद्योग संघटनांना दिले. यामुळे उर्वरित रस्त्यांची कामे होणार असल्याची माहिती उद्योग संघटनांतर्फे देण्यात आली. 

चिकलठाणा एमआयडीसीत ३१ किलोमीटर बाहेरील व अंतर्गत रस्ते आहेत. यापैकी ब्ल्यू बेल्सपासून एमआयडीसीत जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहेत. हा रस्ता सिमेंटचा बनवण्यात आला आहे. यासह ग्रीव्हज कंपनी ते जॉली बोर्ड व जॉलीबोर्ड कंपनी ते नारेगाव असा एल टाईप दीड किलोमीटर रस्त्याचे कामही मंजूर करण्यात आले आहे. महापालिका व एमआयडीसी मिळून हा दीड किलोमीटरचा सिमेंटचा रस्ता तयार होत आहे. ब्रिजवाडी ते प्रतीक इंजीनियरिंग पर्यंत सव्वा किलो मीटर कामात प्रारंभ झाला आहे. या कामासाठी नगरसेवक राजू शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. दोन दिवसांपूर्वी प्रत्यक्ष या कामास सुरुवात झाली आहे. 

पालकमंत्र्यांचे आश्‍वासन 
उद्योग संघटनांतर्फे चिकलठाणा, रेल्वेस्टेशन परिसरात काम करणाऱ्या कामगारांची अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. या कार्यक्रमास २५ जुलैला उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी चिकलठाणाच्या टेस्ट सेंटरला भेट दिली. या भेटीत त्यांनी एमआयडीसीतील खराब रस्त्यांचा अनुभवही घेतला. त्यानंतर एमआयडीसी कार्यालयातून चिकलठाण्यातील रस्त्या बद्दल संपूर्ण माहिती मागवण्यात आली असल्याचे मासिआतर्फे सांगण्यात आले. उद्योग संघटनांकडून मागवण्यात आलेले चिकलठाण्यातील रस्त्यांचे प्रपोजल एमआयडीसीतर्फे तयार करून ते पुढील आठवड्यात वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

चिकलठाणा एमआयडीसीतील ब्रिजवाडीपर्यंतच्या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे. यासाठी नगरसेवक राजू शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. पालकमंत्र्यांनी ही चिकलठाण्यातील रस्त्यांची दुरवस्था पाहून यासाठी नक्की काम करतो, असे आश्वासन दिले आहे. यामुळे चिकलठाण्यातील कामे पूर्ण होतील. 
-अभय हंचनाळ, अध्यक्ष, मसिआ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com